ग्रामपंचायतीचा धुरळा! भाजप नंबर वन, राष्ट्रवादी दुसरा, शिवसेना आणि शिंदे गट कितवा?

| Updated on: Sep 19, 2022 | 9:12 PM

608 ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर शिवसेना आणि शिंदे गटाची कामगिरी पाहण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

ग्रामपंचायतीचा धुरळा! भाजप नंबर वन, राष्ट्रवादी दुसरा, शिवसेना आणि शिंदे गट कितवा?
Follow us on

मुंबई : 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल(gram panchayat elections) जवळपास स्पष्ट झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकी भाजपनेच गुलाल उधळला आहे. निकाल भाजपने अव्वल स्थानी मुसंडी मारली आहे. तरस राष्ट्रवादीच्या घडाळ्याने टायमिंग साधत दुसरे स्थान पटकावले आहे.

608 ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर चौथ्या क्रमांकावर शिंदे गट आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानावर गेली आहे

कोरोनानंतर गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. यात पक्षाचा विचार केला तर, भाजप मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेले शिल्लक सेना असं म्हणत डिवचले आहे.

ग्राम पंचायतीच्या निवडणुका, पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. पण, पक्षाच्या विचारधारेच्याच स्थानिक आघाड्या असतात. आता भाजप आणि शिंदे गट तसंच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा विचार केला. तर महाविकास आघाडीचा आकडा मोठा होतो असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

शिंदे-भाजप सरकारनं यंदा थेट जनतेतून संरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्यानुसार अनेकांना सरपंच पदाची लॉटरीही लागली.
मात्र जल्लोषाबद्दल बोलायचं झालं, तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधला जल्लोष हटके होता. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा डंका पाहायला मिळाला.