“पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडतं, आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल”, प्रविण दरेकरांना विश्वास

| Updated on: Jul 04, 2022 | 10:41 AM

Pravin Darekar : अग्निपरीक्षा काल होती, आज जिंकणारच- दरेकर

पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडतं, आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल, प्रविण दरेकरांना विश्वास
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे गट आणि भाजपचं हे सरकार फार काळ टिकणार नाही. ते फारफार तर पाच ते सहा महिने टिकेल, लगोलग मध्यावधी निवडणुका लागतील, असं विधान केलं. त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपका हुकुम सर आखों पर म्हणत पाठिंबा दिला. तर भाजपकडून मात्र याला विरोध होत आहे. “पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडतं, आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल”, असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केलाय. शिंदे सरकारवरचा विश्वास आज संमत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

“आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल”

सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता प्रवीण दरेकरांनी फेटाळली. शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर उलट घडतं. त्यामुळे पुढची काही दशकं हे सरकार काम करत राहिलं, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पवार म्हणाले होते, की आमदार मुंबईत आल्यावर त्यांचं मतपरिवर्तन होईल. पण तसं काही झालं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला धक्का लागण्याची कोणतीही शक्यता नाही, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.

अग्निपरीक्षा काल होती, आज जिंकणारच- दरेकर

शिंदे सरकारवरचा विश्वास आज संमत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आज संपूर्ण महाराष्ट्र खूश, समाधानी आणि आनंदी आहे, असं दरेकर म्हणालेत. अडीच वर्षांत मविआने जनतेला समाधानी ठेवलं नाही, असंही दरेकर म्हणाले. आज 164 पेक्षा जास्त आमदार आम्हाला मतदान करील, अशी शक्यता प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे. उत्स्फूर्तपणे आमदार शिंदेंना पाठिंबा देतील, असंही दरेकर म्हणालेत.

हे सुद्धा वाचा