….तर उल्हासनगरच्या भाजप आमदाराला दररोज चपलेने मारु, भाजपच्या माजी प्रवक्त्याचीच धमकी

| Updated on: May 10, 2021 | 7:43 AM

आयलानी हे लोकांची कामं करत नाही. त्यामुळे त्यांना दररोज चपलेने मारू, अशी धमकी भाजपचे प्रवक्ते राम वाधवा यांनी दिली आहे. (BJP spokesperson threatens Ulhasnagar BJP MLA)

....तर उल्हासनगरच्या भाजप आमदाराला दररोज चपलेने मारु, भाजपच्या माजी प्रवक्त्याचीच धमकी
Kumar Ayalani
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांना त्यांच्याच पक्षाच्या माजी प्रवक्त्याने एक विचित्र धमकी दिली आहे. आयलानी हे लोकांची कामं करत नाही. त्यामुळे त्यांना दररोज चपलेने मारू, अशी धमकी भाजपचे प्रवक्ते राम वाधवा यांनी दिली आहे. त्यामुळे उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. (BJP spokesperson Ram Wadhwa threatens Ulhasnagar BJP MLA Kumar Ayalani)

राम वाधवांचे नेमके आरोप काय?

उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी हे कोरोनाच्या कठीण काळात शहरात फिरत नाही. तसेच ते लोकांची काहीही मदत करत नसल्याचा आरोप राम वाधवा यांनी केला आहे. आयलानी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्टला जास्त असतात. त्यामुळेच त्यांनी आमदार कुमार आयलानी यांना आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या आठ दिवसात कुमार आयलानी यांनी दररोज शहरात फिरावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यानंतर त्यांना दररोज आम्ही चपलेने मारू, असा इशारा राम वाधवा यांनी दिला आहे.

आयलानी यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ उरला आहे. त्यामुळे तितके दिवस आमच्यापैकी कुणीतरी दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु. त्यासोबतच पोलीस आमच्यावर केस करणार असतील, तर त्यासाठीही आम्ही सगळी तयारी केली आहे. जामीन, वकील तयार ठेवले आहेत, असेही राम वाधवा म्हणाले.

आयलानी यांनी आरोप फेटाळले

राम वाधवा यांनी याबाबत ट्वीट केले असून त्यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केले आहे. या सगळ्याबाबत आमदार कुमार आयलानी यांना विचारलं असता, त्यांनी आपण दररोज लोकांचीच कामं करत असल्याचं सांगितलं. आपण दररोज दिवसभर ऑफिसला बसलेलो असतो. शिवाय शहरातही एकटे फिरतो. त्यामुळे ज्यांची हिंमत असेल त्याने मला फक्त हात लावून दाखवावा, असा अप्रत्यक्ष इशारा आयलानी यांनी राम वाधवा यांना दिला आहे.

उल्हासनगर शहरात खळबळ

या सगळ्यानंतर आमदार कुमार आयलानी यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राम वाधवा यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. राम वाधवा यांनी यापूर्वी निवडणुकीच्या काळात पप्पू कलानी यांना आतंकवादी म्हणून संबोधलं होतं. त्यामुळेही बराच वाद उल्हासनगर शहरात पेटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशारितीने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुढे त्याचं नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल. (BJP spokesperson Ram Wadhwa threatens Ulhasnagar BJP MLA Kumar Ayalani)

संबंधित बातम्या : 

“प्राण कंठाशी आलेल्या लोकांचा वाली कोण? राष्ट्रीय समितीनेच कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा”

‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती’, नितीन गडकरींचं भाजप नेते, कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन

मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे आरोग्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार