AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे आरोग्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार

जर येत्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करु, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. (Mard Doctors Delegation Meet MNS Raj Thackeray)

मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे आरोग्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार
राज ठाकरे, मनसे प्रमुख
| Updated on: May 09, 2021 | 2:26 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या सध्याच्या भयानक परिस्थितीत मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र तरीही या डॉक्टरांना अद्याप वेतनवाढ मिळालेली नाही. याशिवाय त्यांच्या विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. यांसह इतर सर्व मागण्यांचे गाऱ्हाण घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. त्यांच्यापुढे हे सर्व विषय मांडणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. (Mumbai Resident Mard Doctors Delegation Meet MNS Raj Thackeray at Krishnakunj for verious demand)

मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला 

मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्या डॉक्टरांनी गेल्या 11 महिन्यातील थकीत वेतनवाढ झालेले वेतन आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे वेतन त्वरित मिळावे, अशी प्रमुख मागणी या डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली. या मागणीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला.

मागण्या काय?

कोरोना काळात मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मुंबईत एकूण 3 हजार मार्ड डॉक्टर आहेत. पण तरीही त्या डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेलं नाही. याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फीदेखील आकारली आहे. जर येत्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करु, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

लवकरच न्याय मिळेल, राज ठाकरेंचे आश्वासन

या पार्श्वभूमीवर आम्हाला न्याय भेटावा म्हणून आम्ही राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आम्हाला या संदर्भात न्य़ाय़ मिळेल असं आश्वासन दिलं आहे. गेल्या दोन दिवासांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यामातून आंदोलन करतो आहे. कोरोना रूग्णांना त्रास होणार नाही यांची आम्ही काळजी घेत आहोत, असेही ते म्हणाले.

लवकरच राजेश टोपेंची भेट घेऊन विषय मांडतील – बाळा नांदगावकर

आपण डॉक्टरांना एकीकडे आपण देवदूत म्हणतो. मात्र त्यांच्यावर गरज सरो वैद्य मरो अशी वेळ आहे. कोरोना काळात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांना सरकारने वाढवलेले मानधन द्यावे. दहा हजार ही रक्कम महानगरपालिकेसाठी छोटी असली तरी डॉक्टरांसाठी मोठी आहे.

तसेच राज्यभरात डॉक्टरांचा टीडीस कापला जात नाही तर मग महानगरपालिका निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात टीडीएस का कापत आहे, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. तसेच लवकरच राज ठाकरे राजेश टोपे यांची वेळ घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडतील, असेही ते म्हणाले. (Mumbai Resident Mard Doctors Delegation Meet MNS Raj Thackeray at Krishnakunj for verious demand)

संबंधित बातम्या : 

भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

अकरावी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा घ्यायची का? दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मत नोंदवण्याचं आवाहन

विरोधकांनी राजकीय टीका टाळा, राज्याला पुरेशा लसी मिळण्यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहा, रोहित पवारांचा सल्ला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.