Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात, महाराष्ट्रात आमचं ‘मिशन 48’, मग शिंदे गटाचं काय?; भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय?

Raosaheb Danve : भाजप सत्तेत येणार नाही, असं सांगितलं जात होतं. पण भाजप 2014 पेक्षा जास्त बहुमताने सत्तेत आला. आता 2024 निवडणुका आहेत. आम्ही ज्या दिवशी निवडणुका जिंकतो. त्याच दिवशी पुढच्या निवडणुकांची तयारी करत असतो. त्यामुळे मिशन 45 नाही, 48 आहे.

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात, महाराष्ट्रात आमचं 'मिशन 48', मग शिंदे गटाचं काय?; भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय?
रावसाहेब दानवे म्हणतात, महाराष्ट्रात आमचं 'मिशन 48', मग शिंदे गटाचं काय?
Image Credit source: tv9 marathi
प्रदीप कापसे

| Edited By: भीमराव गवळी

Aug 07, 2022 | 12:29 PM

पुणे: एकनाथ शिंदे गटाने (cm eknath shinde) भाजपसोबत (bjp) युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजपसोबत युती करूनच लढणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलंही जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजपमधून वेगळेच दावे करण्यात येत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात भाजपचं मिशन 45 नाही तर मिशन 48 असणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप जर महाराष्ट्रात मिशन 48 राबवणार आहे तर मग शिंदे गटाचं काय? भाजप शिंदे गटाला वाऱ्यावर सोडणार की भाजपच्याच तिकीटावर शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट देणार असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी मिशन 48वर भाष्य केलं आहे.

भाजप सत्तेत येणार नाही, असं सांगितलं जात होतं. पण भाजप 2014 पेक्षा जास्त बहुमताने सत्तेत आला. आता 2024 निवडणुका आहेत. आम्ही ज्या दिवशी निवडणुका जिंकतो. त्याच दिवशी पुढच्या निवडणुकांची तयारी करत असतो. त्यामुळे मिशन 45 नाही, 48 आहे. तीन जागा कोणत्या सोडत आहात? जालना सोडत आहात का? त्यामुळे मिशन 45 नाही, 48 आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कार्यकर्त्यांना कामाला लावणे, लोकांत जाणे, सरकारच्या योजना लोकांना सांगणं हे काम आमचे कार्यकर्ते करत असतात. मीही बिहार आणि झारखंडमध्ये जाऊन लोकांना ही माहिती देणार आहे. निर्मला सीतारामन या नेत्या म्हणून बारामतीत जाणार आहेत. त्यामुळे 45 नाही तर 48 मतदार संघावर आमचं लक्ष असणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचं चॅलेंज नाही

आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं चॅलेंज नाही. युती असताना सहा आणि युती नसताना चार एवढेच खासदार आतापर्यंत राष्ट्रवादीचे आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आम्हाला चॅलेंज नाही आणि ते काही आमचं टार्गेट नाहीये. तुम्हाला निर्मला सीतारामन बारामतीत चालल्या आहेत म्हणून असं वाटतं. पण प्रत्येक नेत्यांनी मतदारसंघात जाणं त्या ठिकाणी सरकारी कार्यक्रम करणं, परिस्थितीचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं हा भाजपचा अजेंडा आहे, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

औरंगजेब वाईटच होता

यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना फटकारलं. संपूर्ण महाराष्ट्राला औरंगजेबाचा इतिहास माहीत आहे. मी काय म्हणतो, या पेक्षा तुम्ही जनतेत गेलं पाहिजे. जनतेला प्रश्न विचारला पाहिजे. त्यांना काय वाटतं हे समजून घेतलं पाहिजे. एकटे अबू असीम आजमी म्हणतात याचा अर्थ त्या मतावर लोक सहमत आहेत असं नाही. औरंगजेब वाईट होता, त्यांनी किती छळ आणि नाश केला हे सर्व महाराष्ट्राल माहीत आहे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें