AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग न्यूज: संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; आजच तुरुंगातून बाहेर येणार

सत्र न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही कोर्टातून जामिनाची कागदपत्रं घेतली असून ही कागदपत्रे तुरुंग प्रशासनाकडे दिली आहे.

बिग न्यूज: संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; आजच तुरुंगातून बाहेर येणार
संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध
| Updated on: Nov 09, 2022 | 5:19 PM
Share

मुंबई: अखेर उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राऊत यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी 7 वाजता राऊत यांची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या या जामिनाला विरोध करत ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.

राऊतांच्या जामिनाला तात्काळ स्थगिती देण्याच्या ईडीच्या मागणीला कोर्टाने नकार दिला. सत्र न्यायालयाने एक महिना प्रकरण ऐकून घेतलं. त्यामुळे वेळ दिला नाही असं कसं म्हणता येईल? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर प्रकरणावर सुनावणी करू नका. फक्त जामिनाला स्टे द्या, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.

ईडीच्या या युक्तिवादावर कोर्टाने उलट प्रश्न केला. वेळ शिल्लक नसताना जामिनाला स्थगिती देण्यासाठी आग्रही असणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सत्र न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही कोर्टातून जामिनाची कागदपत्रं घेतली असून ही कागदपत्रे तुरुंग प्रशासनाकडे दिली आहे. येत्या दोन तासात म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राऊत तुरुंगाच्या बाहेर असतील, असं राऊत यांचे वकील अॅड. नितीन भोईर यांनी सांगितलं.

राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी ईडीने अटक केली होती. गेले 102 दिवस ते ईडीच्या कोठडीत होते. त्यांना अखेर 102 दिवसानंतर जामीन देण्यात आला आहे. राऊत यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत कोर्टाने ईडीला चपराक लगावली आहे.

Follow Us
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष