वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल, चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

| Updated on: Jan 02, 2021 | 9:06 PM

तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (Chandrakant Patil Wrote letter to Rashmi Thackeray)

वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल, चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र
Chandrakant Patil-Rashmi-Thackeray
Follow us on

मुंबई : दैनिक ‘सामना’तील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज आहेत. नुकतंच त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी सामना वृत्तापत्रातील भाषेबाबतची तक्रार केली आहे. जर आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (Chandrakant Patil Wrote letter to Rashmi Thackeray for derogatory language in Saamana Editorial)

चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र 

“गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!”

“वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल.”

“आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा,” असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.

संजय राऊतांचा खोचक टोला

चंद्रकांतदादा रश्मी ठाकरे यांना पत्र लिहित असतील तर ताबडतोब लिहा. बापरे, ते पत्रं लिहित आहेत. मला त्याची भीती वाटते, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. चंद्रकांतदादा ‘सामना’ वाचतात ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते ‘सामना’ वाचत नव्हते. आज वाचतात. चांगलं आहे. त्यांनी ‘सामना’ रोज वाचला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. रोज पेपर वाचत राहिले तर आघाडी सरकार पाच वर्षे कायम राहणार असल्याचा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण होईल, असा चिमटाही त्यांनी काढला. (Chandrakant Patil Wrote letter to Rashmi Thackeray for derogatory language in Saamana Editorial)

संबंधित बातम्या : 

चंद्रकांतदादा पत्र लिहिणार..? अरे बापरे..! ताबडतोब… भीती वाटते मला : राऊत

माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण, चंद्रकांतदादा थेट रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार