सोनिया गांधींचं ATM म्हणजे ‘हा’ नेता, भाजपची टीका, राजकारण तापलं!

| Updated on: Oct 13, 2022 | 10:52 AM

रमण सिंहांना प्रत्युत्तर देताना भूपेश बघेल म्हणाले, तुमचे आरोप आधी सिद्ध करा किंवा जाहीर माफी मागा. नाही तर योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल.

सोनिया गांधींचं ATM म्हणजे हा नेता, भाजपची टीका, राजकारण तापलं!
सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
Image Credit source: social media
Follow us on

रांचीः ईडीच्या कारवायांमुळे तापलेलं छत्तीसगड आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman singh) यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे ATM आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. यावरून भूपेश बघेल (Bhupesh Baghel) संतापले आहेत. आधी या वक्तव्याचा पुरावा द्या नाही तर मानहानीचा दावा ठोकतो, असा इशारा त्यांनी दिलाय.

छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरु आहे. राज्यातील या ईडीच्या छापेमारीवर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी वक्तव्य केलं.

सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे एटीएम असल्याचं मी वर्षभरापासून सांगतोय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे. जमा झालेला पैसा आसाम, त्यानंतर हिमाचल प्रदेशात पाठवला जातो. कलेक्टरला कलेक्शन एजंट बनवलंय. आज त्याच एजंटच्या घरावर ईडी छापेमारी करत आहे, असा आरोप रमण सिंह यांनी केलाय.

आता काँग्रेस संपुष्टात येण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठीच आम्ही देशभर लढत आहोत. जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे, असं वक्तव्य रमण सिंह यांनी केलंय.

रमण सिंहांना प्रत्युत्तर देताना भूपेश बघेल म्हणाले, तुमचे आरोप आधी सिद्ध करा किंवा जाहीर माफी मागा. नाही तर योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल.

ईडीच्या कारवायांना घाबरतो कोण? ज्यांच्या मनात भीती आहे, तेच घाबरतात. रमणसिंह पुन्हा पुन्हा जोक करत असतात. त्यांना ग्राउंड रिअॅलिटी माहिती आहे, त्यामुळेच ते काँग्रेसबाबत असं वक्तव्य करत असल्याचं भूपेश बघेल म्हणाले.