अनेकजण माझ्या संपर्कात : छगन भुजबळ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

पुणे : माझ्या संपर्कात खूप जण आहेत, पण त्यांची ता नावं सांगणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा चर्चांना तोंड फोडलं आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपमधीली काही नेते संपर्कात असल्याचे सांगून, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आता भुजबळांनीही तसेच वक्तव्य केल्याने, पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. येत्या […]

अनेकजण माझ्या संपर्कात : छगन भुजबळ
Follow us on

पुणे : माझ्या संपर्कात खूप जण आहेत, पण त्यांची ता नावं सांगणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा चर्चांना तोंड फोडलं आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपमधीली काही नेते संपर्कात असल्याचे सांगून, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आता भुजबळांनीही तसेच वक्तव्य केल्याने, पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. येत्या काळात ‘घरवापसी’ सुरु होणार का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत एनडीएतून नुकतेच बाहेर पडलेले उपेंद्र कुशवाह यांनी पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनीही विविध विषयांवर आपल्या भूमिका मांडल्या.

“लोकशाहीवर घाला घालण्याचं काम केलं गेलं आहे. हम करे सो कायदा असं भाजपचं वर्तन असून, त्यांच्या शेवटाला कालपासून सुरुवात झाली आहे”, असे सांगताना छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मोदी आणि भाजप यांच्या विरोधात असणाऱ्यांना एकत्र करणार असून, माझ्या संपर्कात खूप जण आहेत, मात्र त्यांची नावं आता सांगणार नाही.”

2014 मध्ये ‘विकास’ हा पर्वणीचा शब्द घेऊन प्रचार केला गेला, मात्र निवडणूक आल्यावर विकासावर बोलायला तयार नाहीत, असे म्हणत भुजबळांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • प्लॅनिंग कमिशनची सत्तेत आल्याबरोबर वाट लावली – भुजबळ
  • राम आणि हनुमानाची जात काढली गेली – भुजबळ
  • मीडियालाही गप्प करण्याचा प्रयत्न केला गेला – भुजबळ
  • लोकशाहीवर घाला घालण्याचं काम केलं, हम करे सो कायदा सुरु झालाय – भुजबळ
  • भाजपच्या शेवटला कालपासून सुरवात झालीय – भुजबळ
  • मोदी आणि भाजप यांच्या विरोधात असणाऱ्यांना एकत्र करणार – भुजबळ
  • हमको अच्छे दिन नाही, पण हमारे दिन चाहीए – भुजबळ
  • माझ्या संपर्कात खूप आहेत, पण त्याची नावं नाही सांगणार – भुजबळ

उपेंद्र कुशवाह काय म्हणाले?

विकासाचं वचन देण्यात आलं होतं, मात्र त्यांचाच अजेंड चालवला जात आहे. त्यामुळे आम्ही बाजूला झालो, असे उपेंद्र कुशवाह म्हणाले. तसेच, आता मोदी सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असेही ते म्हणाले.