संभाजीराजे छत्रपती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन का भेटले? चंद्रशेखर राव यांच्या भेटीमागील राजकीय अर्थ काय?

| Updated on: Jan 27, 2023 | 9:46 AM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के शंकरराव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

संभाजीराजे छत्रपती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन का भेटले? चंद्रशेखर राव यांच्या भेटीमागील राजकीय अर्थ काय?
Image Credit source: Google
Follow us on

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नुकतीच भेट घेतली आहे. तेलंगणा येथे जाऊन संभाजीराजे यांनी तेलंगणा मॉडेल समजून घेतले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हंटलय, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे म्हंटले आहे. श्री राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केल्याचे संभाजीराजे यांनी सांगत श्री राव यांनी गेल्या 14 वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणल्याचे म्हंटले आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहे असं सांगत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

तेलंगणा येथीलल योजना आणि कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. चंद्रशेखर राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व असल्याचे संभाजीराजे म्हणाले आहे.

संभाजीराजे यांचं चंद्रशेखर राव यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केलेय. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव असल्याचेही संभाजीराजे यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

भेटीमागील राजकीय अर्थ काय?
संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना सुरू केली आहे. पंचसूत्रीच्या माध्यमातून संभाजीराजे थेट सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये स्वराज्य संघटना राजकीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यात राज्यातील राजकारण बघता नवीन राजकीय संस्कृती निर्माण करण्यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहे. तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशात परिचित आहे. अवघ्या 14 वर्षात तेलंगणा राज्याचा कायापालट होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही? याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि के चंद्रशेखर राव यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.