“नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांच्या विधानावर बोट ठेवलंय. "नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना", असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:13 PM

मुंबई : राहुल गांधी यांना ईडीने (Rahul Gandhi ED) नोटीस पाठवली. त्यानंतर आज राहुल गांधी ईडी कार्यालयाकडे जात आहेत. अश्यात देशभर काँग्रेस नेते कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना त्रास देत आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. त्यांच्या याच विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बोट ठेवलंय. “नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय?

राहुल गांधींना आलेली ईडीची नोटिस आणि त्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यटांनी केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय. “नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना त्रास देत आहे. हे षडयंत्र आहे. म्हणूनच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू आहे. हा छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावर आता चित्रा वाघ यांनी टिका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर आमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा द्या आम्हीही आम्हाला हवी ती माणसं शिवसेनेसोबत आणू , असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर या जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते. त्यानरून “भीक मागून काहीच मिळत नाही. ED तर मुळीच नाही!”, असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला होता.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.