प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार : मुख्यमंत्री

| Updated on: Nov 03, 2019 | 2:48 PM

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहचणार. यासाठी सरकारी यंत्रणेकडून मोठं काम केले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान आयोजित केलेल्या आढावा (Cm devendra fadanvis dorught tour) बैठकीत सांगितले.

प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार : मुख्यमंत्री
Follow us on

अकोला : प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहचणार. यासाठी सरकारी यंत्रणेकडून मोठं काम केले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान आयोजित केलेल्या आढावा (Cm devendra fadanvis dorught tour) बैठकीत सांगितले. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यातील पिकांच नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यासाठी आज (3 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी (Cm devendra fadanvis dorught tour) शेतकऱ्यांसाठी अनेक उपाय योजना सुचवल्या प्रत्येकाला मदत मिळणार, अशा विश्वास त्यांनी दिला.

“गेल्या 14 दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि पुढे आणखी काही दिवस पाऊस पडणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता मदतीचा ओघ हा आतापर्यंतच्या मदतीपेक्षा मोठा असणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहचली पाहिजे. यासाठी यंत्रणेने मोठं काम केलं जाईल. दुष्काळात जी मदत करतो ती सगळी मदत केली जाईल. चांगलं काम असेल तर ते नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा करु शकता”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“गेल्या 39 ते 40 वर्षात एवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. सोयाबीन पूर्णपणे खराब झाला, ज्वारी काळी पडली. काल मी बैठक घेऊन मदत जाहीर केली. आता पंचनामे केले जात आहेत. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पूर्णपणे मदत केली जाईल. जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी काम केलं पाहिजे. दुष्काळाप्रमाणे हा ओला दुष्काळ आहे. त्या दृष्टीने मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांना वसुलीला समोर जाण्याची पाळी येऊ नये”, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं.

“या जिल्ह्यात विमा कवच चांगलं आहे. मात्र त्यांच्याकडे मोठा स्टाफ नसल्याने सरकारी पंचनाम्याच्या आधारावर मदत दिली जाईल. पंचनामा झाला नाही तर त्याचा फोटो असेल तरी मदत दिली जाईल. या कामासाठी सगळ्यांची मदत घेतली जाईल”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. हेल्पलाईन सर्वत्र सुरु करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी केली जाईल. त्यासाठी कामही सुरु आहे. आता रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. पाण्याची उपलब्धता आहे त्याचा वापर केला पाहिजे”.