फडणवीसांना धक्का, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला मोदींकडून केराची टोपली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांची एक मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेटाळली आहे. बुलेट ट्रेन नाशिकमार्गे वळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  त्यासाठी फडणवीसांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. पण त्यांची ही मागणी फेटाळण्यात आल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती […]

फडणवीसांना धक्का, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला मोदींकडून केराची टोपली
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांची एक मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेटाळली आहे. बुलेट ट्रेन नाशिकमार्गे वळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  त्यासाठी फडणवीसांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. पण त्यांची ही मागणी फेटाळण्यात आल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती समोर आणली आहे.

मुख्यमंत्र्यांनी 13 जानेवारी 2016 मध्ये पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकमधून नेण्यात यावा, त्यामुळे या भागाला फायदा होईल, असं म्हटलं होतं.  पण आता बुलेट ट्रेनचा मार्ग हा मुंबई, ठाणे, विरार, बोईसरमार्गे पुढे गुजरात असाच असेल, हे माहिती अधिकारातून समोर आलं आहे.

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर देऊन, बुलेट ट्रेन नाशिकमार्गे वळवणे परवडणारं नसल्याचं म्हटलं आहे. तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या या मार्गे बुलेट ट्रेन वळवणं शक्य नाही, असं सिन्हा यांनी म्हटलंय. दुसरीकडे त्यांनी नाशिकला मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोअला जोडता येईल का याबाबत अभ्यास करु असंही म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आणि केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचा आरोप आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात तर उर्वरीत 8 स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि  साबरमती यांचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा असेल, असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे.