….म्हणून ‘सामना’मध्ये नाणारची जाहिरात : मुख्यमंत्री

| Updated on: Feb 18, 2020 | 11:14 AM

शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते 'सामना'तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं

....म्हणून सामनामध्ये नाणारची जाहिरात : मुख्यमंत्री
Follow us on

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो, जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर आपली भूमिका स्पष्ट केली.  दोन दिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण (Uddhav Thackeray on Nanar Ad Saamana) दिलं.

‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते ‘सामना’तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. म्हणून मी म्हणतो, अशा जाहिराती दररोज येत असतात, हा विषय संपला’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या नाणारच्या जाहिरातीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

नाणारच्या जाहिरातीमुळे संभ्रम

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची ‘नाणार’वरुन कोंडी झाली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तच नाणार प्रकल्पाची भलामण करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

हेही वाचा – भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही : उद्धव ठाकरे

भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबवल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन शिवसेनेने दिलं होतं. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच शिवसेनेने नाणारवरुन भूमिका बदलल्याची चर्चा होती.

‘सामना’मध्येच नाणारला समर्थन देणारी जाहिरात छापून आल्याने गोंधळाचं वातावरण होतं. कोकणात नाणार प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कोकणवासियांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. (Uddhav Thackeray on Nanar Ad Saamana)