AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही : उद्धव ठाकरे

केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र  भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad)

भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही : उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 18, 2020 | 11:10 AM
Share

सिंधुदुर्ग : “एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad) यांनी दिलं. ते सिंधुदुर्गात बोलत होते. एल्गार परिषद हा विषय वेगळा आहे. केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र  भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad)

राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

नीट लक्षात घ्या की एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे, त्याच्यात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. तपास केंद्र सरकारने जो आपल्याकडून काढून घेतला आहे तो एल्गारचा आहे, भीमा कोरेगावचा नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका. मी पुन्हा सांगतो, एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत काल काय चर्चा झाली?

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. काल मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Koregaon Bhima SIT) पत्रकार परिषदेत दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. एसआयटी स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होतं. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकते, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या 

कोरेगाव-भीमा प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...