मुंडेसाहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेन, मुख्यमंत्र्यांचा पंकजांना रिप्लाय

| Updated on: Dec 02, 2019 | 6:34 PM

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडेंच्या (CM Uddhav Thackerays reply to Pankaja Munde) ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही.

मुंडेसाहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेन, मुख्यमंत्र्यांचा पंकजांना रिप्लाय
Follow us on

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडेंच्या (CM Uddhav Thackerays reply to Pankaja Munde) ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही. मात्र पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पंकजा मुंडेंची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल, असं म्हटल्याने, चर्चांना उधाण आलं आहे. (CM Uddhav Thackerays reply to Pankaja Munde)

या सर्व पार्श्वभूमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे. पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करणारं ट्विट 28 तारखेला शपथविधीनंतर केलं होतं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रिप्लाय दिला.

‘मुंडेंना अभिप्रेत महाराष्ट्र घडवणार’

पंकजांना रिप्लाय देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो”.

पंकजा मुंडेंचं 28 नोव्हेंबरचं ट्विट

आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’

पंकजा मुंडेंबाबतच्या बातम्या निराधार : चंद्रकांत पाटील

सेना नेते संजय राऊतांनी पंकजाबद्दल केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडेंनी स्पष्टीकरण दिलं. अपघातानं आलेल्या सरकारचे मनातील मांडे खाणं सुरु आहे. अशा प्रकारच्या बातम्यांना कोणताही अर्थ नाही. या सर्व अफवा असल्याचं चंद्रकातं पाटील म्हणाले.

ठाकरे-महाजन-मुंडे परिवाराचे जिव्हाळ्याचं संबंध आहेत. हे नातं राजकारणापलिकडचे आहे. याचा अर्थ पंकजा मुंडे भाजप सोडून इतर पक्षांमध्ये जाणार असा होत नाही, असं विनोद तावडे म्हणाले.

संबंधित बातम्या 

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत