मुंबई महापालिकेत नगरसेविकेचा विनयभंग, काँग्रेस नगरसेवकाला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा

| Updated on: Sep 21, 2019 | 8:25 PM

काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मुंबई महानगरपालिकेच्या उपहारगृहात काँग्रेसमधील एका नगरसेविकेचा विनयभंग (Congress Corporter molestation case)  केला होता.

मुंबई महापालिकेत नगरसेविकेचा विनयभंग, काँग्रेस नगरसेवकाला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मुंबई महानगरपालिकेच्या उपहारगृहात काँग्रेसमधील एका नगरसेविकेचा विनयभंग (Congress Corporter molestation case)  केला होता. जवळपास 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी किला कोर्टातील महानगर दंडाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक किसन मिस्त्री (congress corporator Kishan Mistry) यांना सहा महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंड ठोठावला आहे.

पालिकेच्या उपहारगृहात 23 फेब्रुवारी 2012 रोजी अनेक नगरसेवकांच्या समोर एका महिला नगरसेविकेचा साडी आणि ब्लाऊज खेचत विनयभंग करण्याचा प्रयत्न (Congress Corporter molestation case) करण्यात आला. या नगरसेविका काँग्रेसच्या असून विनयभंग करणारा नगरसेवकही (congress corporator Kishan Mistry) त्यांच्याच पक्षातील होता. किसन मेस्त्री असे विनयभंग करणाऱ्या नगरसेवकाचे नाव होते.

मिस्त्री हे 2007 ते 2012 या काळात चेंबूर येथील वॉर्ड क्रमांक 144 चे नगरसेवक होते. मात्र, 2012 च्या मनपा निवडणुकीत हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला. यामुळे या ठिकाणची उमेदवारी तक्रारदार महिलेला मिळाली. तर दुसरीकडे मिस्त्री यांना कोणत्याच विभागातून उमेदवारी मिळाली नाही. यामुळे 23 फेब्रुवारी 2012 मध्ये मनपातील सभा संपल्यानंतर तक्रारदार नगरसेविका आणि नगरसेवकामध्ये (congress corporator Kishan Mistry) बाचाबाची झाली. त्यानंतर मिस्त्री यांनी उपहारगृहात महिलेच्या अंगावर हात टाकून साडी खेचण्याचा प्रयत्न केला.

या सर्व धक्कादायक प्रकारानंतर पीडित नगरसेविकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार (Congress Corporter molestation case) केली. हा प्रकार अनेक महिला नगरसेविकांच्या समोर झाल्याने त्या साक्ष देण्यासाठी पुढे आल्या. त्यानंतर गेली 7 वर्षे किला कोर्टात या प्रकरणी खटला सुरू होता.

केवळ निवडणुकीत हरल्याचा राग मनात धरून आपल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा प्रकार घडलाच नाही. अस मिस्त्री या खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हणाले होते.