राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटलांना संधी, प्रज्ञा सातव यांना विधानसभा की विधान परिषद?

| Updated on: Sep 20, 2021 | 6:09 PM

राज्यसभेसाठी रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार का? असा प्रश्न काँग्रेसमधूनच विचारण्यात येत आहे.

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटलांना संधी, प्रज्ञा सातव यांना विधानसभा की विधान परिषद?
रजनी पाटील, डॉ. प्रज्ञा सातव
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केलाय. काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार का? असा प्रश्न काँग्रेसमधूनच विचारण्यात येत आहे. (Dr. Pradnya Satav is likely to get a chance in Maharashtra Assembly or Legislative Council)

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या 12 नावांच्या यादीत काँग्रेसकडून रजनी पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मात्र, आता रजनी पाटील यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना रजनी पाटील यांच्या जागेवर विधान परिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडूण गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

डॉ. प्रज्ञा सातव यांना उपाध्यक्षपद

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे.

प्रज्ञा सातव यांना विधानसभेचं तिकीट?

राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवायचे की नाही, याबाबत पक्षाचा निर्णय होऊ शकला नव्हता. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला चर्चा झाली. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला होता.

इतर बातम्या :

Rajya Sabha : राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा

राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसकडून राज्यसभेवर कुणाला संधी? लवकरच उमेदवाराची घोषणा

Dr. Pradnya Satav is likely to get a chance in Maharashtra Assembly or Legislative Council