राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसकडून राज्यसभेवर कुणाला संधी? लवकरच उमेदवाराची घोषणा

काँग्रेसकडून दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात रजनी पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसकडून राज्यसभेवर कुणाला संधी? लवकरच उमेदवाराची घोषणा
रजनी पाटील, प्रज्ञा सातव, मुकूल वासनिक, मिलिंद देवरा
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 5:20 PM

मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात रजनी पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. (After the death of Rajiv Satav, who will get a chance from Congress in Rajya Sabha?)

दुसरीकडे विधान परिषदेत्या राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या 12 जणांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याच काँग्रेसाच एक प्रस्ताव असल्याचंही कळतंय. तर मुकूल वासनिक यांच्या नावाला विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

वेळ आल्यावर भाजपला विनंती करु- थोरात

दरम्यान, प्रमोद महाजन यांची जागा रिक्त झाल्यावर ठरवण्यात आलं. तेव्हा निवडणूक झाली नाही. तशी एक प्रथा आहे. वेळ आल्यावर आम्ही भाजपला विनंती करू, असं महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. भाजपने घोषणा केली पण दुर्दैवी मृत्यू झाल्यावर विनंती करण्यात अडचण नाही. राजकारणात काही संकेत असतात, असं थोरात म्हणाले.

भाजपकडून संजय उपाध्याय

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.

कोण आहेत संजय उपाध्याय?

संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त

काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या :

Goa Election : काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचं गोव्यात वक्तव्य

‘तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त’, आशिष शेलारांचा घणाघात

After the death of Rajiv Satav, who will get a chance from Congress in Rajya Sabha?

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.