VIDEO : बॅनरवर नाव न छापल्याचा राग, मुंबईत भाजप कार्यकर्ते भिडले!

मुंबई : मानापमानाचं नाट्य राजकारणात काही नवीन नाही. मात्र, मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मानापमान नाट्य इतके टोकाला गेले की, हाणामारीपर्यंत पोहोचले. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत तुफान हाणामारी केली. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचा हा सर्व धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडाला येथे भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यावेळी मान्यवरांच्या स्वागत करणाऱ्यांच्या यादीत भाजपच्या […]

VIDEO : बॅनरवर नाव न छापल्याचा राग, मुंबईत भाजप कार्यकर्ते भिडले!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : मानापमानाचं नाट्य राजकारणात काही नवीन नाही. मात्र, मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मानापमान नाट्य इतके टोकाला गेले की, हाणामारीपर्यंत पोहोचले. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत तुफान हाणामारी केली. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचा हा सर्व धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडाला येथे भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यावेळी मान्यवरांच्या स्वागत करणाऱ्यांच्या यादीत भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटोळे यांचे नाव मंडल अध्यक्ष हेमंत भास्कर यांनी घेतले नाही. याचा राग आल्याने पाटोळे यांनी भास्कर यांना शिवीगाळ करीत त्यांना हाणामारी केली आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, या हाणामारीप्रकरणी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने कुणीही अजून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

पाहा व्हिडीओ :