शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणार; ‘या’ कामांसाठी होणार सोशल मीडिया वापर

| Updated on: Oct 25, 2022 | 11:33 AM

आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेतले.

शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणार; या कामांसाठी होणार सोशल मीडिया वापर
शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणार
Image Credit source: ANI
Follow us on

कोल्हापूर: राज्यातील शिंदे सरकारने (shinde camp) आता हायटेक होणार आहे. या सरकारने सोशल मीडियाचा (social media) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जाणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. हे सरकार तुमचंच आहे, असं दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी स्पष्ट केलं.

दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिक्षकांची भरती घेण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. आम्ही जे निर्णय घोषित करतो, त्याची अंमलबजावणी करतो. आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी समाधानाने घरी जावं, असं दीपक केसरकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं. आम्ही नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारवर लिहून रोष ओढवून घेतला होतं. खऱ्या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले आहे, असं ते म्हणाले.

आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आम्ही आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत बोलत रहायचं पण शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही. बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवतोय. बोलणं आणि करणं यात फरक आहे. बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यातला फरक दिसतोय, असा टोला त्यांनी लगावला.

आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल. आम्ही म्हणजे सर्वस्व हे चालत नाही. बाळासाहेब ठाकरे हे जनतेला आपले वाटायचे, असा चिमटाही त्यांनी काढला.