Marathi News Politics Deputy Chief Minister Devendra Fadnavis is the guardian minister of six districts
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री; मुंबईची जबाबदारी कुणावर?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) हे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.