उद्धवजी, शब्द परत घ्या, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

तुमचं आणि त्यांचं पटत नसेल, निराशा असेल... हे मान्य आहे. पण अशा प्रकारे दीड वर्षाच्या नातवाला टार्गेट करणं अपेक्षित नाही. हे शब्द परत घ्या, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

उद्धवजी, शब्द परत घ्या, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 3:20 PM

मुंबईः दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नातवाबद्दल काढलेले उद्गार योग्य नाहीत. त्यांनी ते परत घेतले पाहिजेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. तुमचं आणि त्यांचं पटत नसेल, निराशा असेल… हे मान्य आहे. पण अशा प्रकारे दीड वर्षाच्या नातवाला टार्गेट करणं अपेक्षित नाही. हे शब्द परत घ्या, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं. यावेळी त्यांनी शिंदेंवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसलाय…

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि दीड महिन्याचा नातू रुद्रांश शिंदे यांच्यावर अशी टीका केल्यानंतर त्यांचा निषेध केला जातोय.

उद्धव ठाकरेंनी टीका केल्याचं कळताच चालू भाषणातच एकनाथ शिंदेंनी या टीकेला उत्तर दिलं. दीड वर्षाच्या नातवावर त्यांनी टीका केल्याने मी व्यथित झाल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतरच तुमचं खरं तर अधःपतन सुरु झालं. कुणावर टीका करताय? दीड वर्षाच्या बाळावर? तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का? त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला हवी होती. बाळासाहेबांचे विचार मोडून तुम्ही सत्ता मिळवली..

देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर या वक्तव्यावरून टीका केली. ते म्हणाले, मी यासंदर्भात नाराजी व्यक्त करतो. कुठे चाललाय महाराष्ट्र? एवढ्या खालच्या पातळीवर टीका करायची? एकनाथ शिंदेंच्या नातवाला त्यांनी बोलून टार्गेट केलंय. त्यांनी हे शब्द परत घेतले पाहिजे. तुमचं आणि त्यांचं पटत नसेल, निराशा असेल पण काही पथ्य पाळली पाहिजेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.