विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात : देवेंद्र फडणवीस

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी होत असलेले निर्माते संदीप सिंह यांच्या भाजपशी संबंधावर सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केले होते

विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 28, 2020 | 1:47 PM

पुणे : संदीप सिंह यांचा भाजपशी संबंध आहे का, या कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. “विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात” असा निशाणा फडणवीसांनी साधला. (Devendra Fadnavis answers Sachin Sawant Criticism on Sandeep Singh alleged link with BJP)

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी होत असलेले निर्माते संदीप सिंह यांच्या भाजपशी संबंधावर सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केले होते. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “सचिन सावंत यांचं राज्य चाललं आहे ना? मग मुंबई पोलिसांनी या सगळ्यांना दूर का ठेवलं? या आरोपींना चौकशीसाठी का बोलावलं नाही? पहिल्या दिवसापासून आत्महत्या का म्हटलं?”

“संदीप सिंह दिग्दर्शक म्हणून विषय नाही, मी एखाद्या कार्यक्रमात गेलो असेन, पण त्याच व्यक्तीने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बनणाऱ्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती केली होती, अशीही बातमी काही जणांनी ट्वीट केली होती. सचिन सावंत अलिकडे फार अभ्यास करत नाहीत, त्यांना विधानपरिषदेवर पाठवत नाहीत, म्हणून ते फार निराशेतून बोलतात” अशी टीका फडणवीस यांनी केली.

सचिन सावंत काय म्हणाले होते?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते.” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले सकाळी केले होते.

देवेंद्र फडणवीस पुण्यात 

बाणेरमधील हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा साधला, तर सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं. (Devendra Fadnavis answers Sachin Sawant Criticism on Sandeep Singh alleged link with BJP)

भाजपच्या कोणत्याही नेत्याने आदित्य ठाकरे यांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नाव घेतले नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सध्या ज्या घटना समोर येत आहेत, त्या सीबीआय येईपर्यंत मुंबई पोलिसांना का सापडल्या नाहीत? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? 40 दिवसात पुरावे नष्ट झाले असतील. हार्ड डिस्क नष्ट केल्याचे वृत्त माध्यमात पाहिले. मग पोलिसांवर राजकीय दबाव होता, की काही अडचण होती, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट

(Devendra Fadnavis answers Sachin Sawant Criticism on Sandeep Singh alleged link with BJP)