महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत फडणवीसांचा नवा विक्रम

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मुख्यमंत्रिपद सर्वाधिक भूषवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांना वगळता महाराष्ट्रात झालेल्या आधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची 1 हजार 498 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत, वसंतराव नाईकांनंतर […]

महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत फडणवीसांचा नवा विक्रम
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मुख्यमंत्रिपद सर्वाधिक भूषवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांना वगळता महाराष्ट्रात झालेल्या आधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची 1 हजार 498 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत, वसंतराव नाईकांनंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला.

वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेच्या काळात वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून तब्बल 11 वर्षे 77 दिवस राज्याचा गाडा हाकला. 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकूण तीनवेळा वसंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  • मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ – 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967
  • मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ – 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972
  • मुख्यमंत्रिपदाचा तिसरा कार्यकाळ – 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975

देवेंद्र फडणवीसांनी 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं!

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात एकूण 17 मुख्यमंत्री झाले, आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 18 वे मुख्यमंत्री आहेत. यापैकी आतापर्यंत दिवंगत वसंतराव नाईक हे सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या खालोखाल दिवंगत विलासराव देशमुख हे होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतरावांना वगळता इतर 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आणि दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे.

सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे पाच मुख्यमंत्री!

  • वसंतराव नाईक – सलग 4 हजार 97 दिवस मुख्यमंत्री
  • देवेंद्र फडणवीस – सलग 1 हजार 498 दिवस मुख्यमंत्री
  • विलासराव देशमुख – सलग 1 हजार 494 दिवस मुख्यमंत्री
  • मनोहर जोशी – सलग 1 हजार 419 दिवस मुख्यमंत्री
  • शरद पवार – सलग 1 हजार 98 दिवस मुख्यमंत्री