शरद पवार म्हणाले ठाकरेंचा हात सक्तीने वर केला, “साहेब ! किती हा भाबडेपणा” म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली

| Updated on: Oct 16, 2021 | 6:20 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, याच वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! असं मिश्किल भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले ठाकरेंचा हात सक्तीने वर केला, साहेब ! किती हा भाबडेपणा म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली
SHARAD PAWAR AND DEVENDRA FADNAVIS
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणती भूमिका पार पाडली याची सविस्तर माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, याच वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! असं मिश्किल भाष्य केलं.

जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती

“द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा ? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

…तर मी राजकारणापासून दूर राहिलो असतो

भाजपने शिवसेनेला जे वचन दिले होते त्याचे पालन केले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळा मार्ग शोधावा लागला, असा दावा शिवसेनेचे शीर्षस्थ नेते करत असतात. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावर यंदाच्या दसरा मेळाव्यात भाष्य केलं. भाजपने वचन पाळलं असतं तर मी राजकारणापासून दूर राहिलो असतो. मुख्यमंत्री झालो नसतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हाच धागा पकडत शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कसे आले, याबद्दल सविस्तर सांगितलं.

शरद पवार यांनी सांगितला घटनाक्रम

सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे आली होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं गेलं. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांची हात वर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हात वर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवारांनी सांगितलं

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?; फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देत पवारांनी सांगितला घटनाक्रम

मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्यांकडून सरकार अस्थिर करण्याचा डाव; शरद पवारांचा दावा

‘अर्धेच काय संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही’, मलिकांचं फडणवीसांना आव्हान

(devendra fadnavis criticizes sharad pawar on statement of mahavikas aghadi government formation and uddhav thackeray selection as cm candidate)