AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : अडीच वर्षे राज्य सरकारनं सूड उगविला, देवेंद्र फडणवीस म्हणतात, आता जनता खुला श्वास घेतेय

फडणवीस म्हणाले, सत्ता हे आपलं साधन आहे. सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. हा सत्तेचा गड जिंकलो आहोत. विकासाच्या यात्रेत गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र मागे पडलाय.

Devendra Fadnavis : अडीच वर्षे राज्य सरकारनं सूड उगविला, देवेंद्र फडणवीस म्हणतात, आता जनता खुला श्वास घेतेय
देवेंद्र फडणवीस म्हणतात, आता जनता खुला श्वास घेतेय
| Updated on: Jul 23, 2022 | 5:42 PM
Share

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या  बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, सत्ता परिवर्तन करणे ही बारा कोटी जनतेची इच्छा होती. महाराष्ट्रात (Maharashtra) परिवर्तन झालं पाहिजे, असं त्यांना वाटाचयं. आता आपण मोकळा श्वास घेतोय. गेली अडीच वर्षे ही संघर्षात गेली. महाराष्ट्राच्या इतिहासात (History) पहिल्यांदा राज्य सरकारनं केवळ सूड उगविला, अशी जहरी टीका (Criticism) फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली. ते म्हणाले, सामान्य कार्यकर्ता असो की, इतर कोणी. आमच्याविरुद्ध बोललात तर जेलमध्ये टाकू, अशाप्रकारची आणिबाणी होती. आमच्याविरुद्ध बोलतात तर पोलिसांत टाकू. राज्यात अनाचार, दुराचार, अत्याचार सुरू होता. याची परिसीमा राज्य सरकारनं गाठली होती. सातत्यानं संघर्ष करत होता. मोकळा श्वास घेत बैठक होत आहे. राज्याची जनता मोकळा श्वास घेतेय.

राज्याच्या विकासासाठी परिवर्तन

या जनतेला सरकार म्हणजे कोण आहे, हेच लक्षात येत नव्हतं. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अधोगती झाली. त्यामुळं आपण सत्तेकरिता परिवर्तन केलं नाही. राज्याला विकासाच्या गतीकडं नेण्यासाठी हे परिवर्तन करावं लागलं. प्रगतीचे सर्व कार्यक्रम स्थगित केलं जात होतं. केंद्रानं सुरू केलेले प्रोजेक्ट बंद केले होते. खुर्च्या येतात. जातात. पण, ही अवस्था पाहिल्यानंतर परिवर्तन करायचं ठरविल्याचं फडणवीस म्हणाले.

पहले भी तुफानों को मोड चुका हुँ

एकीकडं भ्रष्टाचार करायचा, दुसरीकडं सूड उगवायला, असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकारनं सुरू केला होता. त्यामुळं राज्यात सत्ता परिवर्तन करण्यात आल्याचं फडणवीस यांनी बैठकीच्या कार्यकारिणीत सांगितलं. घराबाहेर पाऊल ठेवलं तरी केसेस व्हायच्या. मैरी हिंमत को परखने की गुस्ताखी ना करना. पहले भी कही तुफानो को मोड चुका हुँ मैं, असी शेरोशाहिरी फडणवीस यांनी सादर केली.

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचंय

फडणवीस म्हणाले, सत्ता हे आपलं साधन आहे. सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. हा सत्तेचा गड जिंकलो आहोत. विकासाच्या यात्रेत गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र मागे पडलाय. पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या वाटचालीत आणायचा आहे. राज्याला देशात पहिला क्रमांकावर आणायचं आहे. हा गड जिंकायचं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.