Dhananjay Munde : मला वाटतंय की राजकारणात…धनंजय मुंडेंचं राजकीय संन्यासावर मोठं विधान, राजकीय वर्तुळात एकच खळबळ!

सध्या राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली आहे. मला राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी हे भाष्य केल्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Dhananjay Munde : मला वाटतंय की राजकारणात...धनंजय मुंडेंचं राजकीय संन्यासावर मोठं विधान, राजकीय वर्तुळात एकच खळबळ!
DHANANJAY MUNDE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 4:29 PM

Dhananjay Munde : सध्या राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली आहे. मला राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी हे भाष्य केल्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्त्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. आम्ही तुम्हाला साथ देतो, अशी खुली ऑफरच पंकजा मुंडे यांना दिली आहे. एकीकडे पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील राजकीय निवृत्तीबाबत सूचक विधान केलंय. सध्याच्या राजकारणावर बोलताना त्यांनी हे भाष्य केलंय.

वाटतं की खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं

धनंजय मुंडे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज्यातील राजकारण सध्या रसातळाला गेले आहे, अशी खंत व्यक्त केली. ‘सध्या तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. आज सगळीकडे जातीपातीचं धर्माचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं,’ असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी केलं. तसेच पण नंतर लक्षात येतं की आपल्याला पुन्हा समता प्रस्थापित करायची आहे. महापुरुषांनी दिलेले विचार आमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत त्यांनी राजकारणात कायम राहून समाजहितासाठी काम करणार असल्याचेही संकेत दिले.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे परळीमध्ये बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी तेथील रस्त्यांच्या दूरवस्थेवर भाष्य केलं. मी रस्त्यावर खडकत आले. तेव्हा मला कंटाळा आलाय, आता मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंस वाटतं, असं पीएला सांगितल्यांचं पंकजा मुंडे यांनी भर सभेत सांगून टाकलं. नंतर पुढे बोलताना मी सभास्थळी नागरिकांचा उत्साह पाहिला. आता मला नव्याने प्रेरणा मिळाली. मला लोकांचा विकास करायचा आहे, असंही पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या.दरम्यान, आता दोन्ही मुंडे बंधू-भगिनी यांनी राजकारणातून निवृत्त होण्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य केल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, बीडचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us