धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत सोन्याची कमान

| Updated on: Jan 11, 2020 | 12:03 AM

धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी शहर अभूतपूर्व सजले आहे. संपूर्ण शहरभर होर्डिंग, बॅनर, विद्युत रोषणाई, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत सोन्याची कमान
Follow us on

बीड : परळी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे प्रथमच परळीत येत (dhananjay munde felicitation at parli) आहे. या पार्श्वभूमीवर परळीत विजयी मिरवणूक आणि नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी शहर अभूतपूर्व सजले आहे. संपूर्ण शहरभर होर्डिंग, बॅनर, विद्युत रोषणाई, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या व्यापार पेठेत एका ठिकाणी सोन्याच्या दागिनांच्या कमान उभारण्यात आली आहे. सध्या ही कमान परळीत चर्चेचा विषय ठरला आहे.

धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत येत असल्याने मुंडे समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. यात सभास्थळावरुन काही अंतरावर सोन्याच्या दागिन्यांची स्वागत कमान उभारण्यात आली आहे. ही कमान बघण्यासाठी नागरिकही मोठी गर्दी करत आहेत. या कमानीचे कमानीचे संरक्षण करण्यासाठी कमांडो उभे करण्यात आले आहेत.

त्यासोबतच शहराच्या विविध प्रमुख मार्गावरून स्वागत कमानी व होर्डिंग्ज लागल्या आहेत. तसेच संपूर्ण शहरात डिजीटल बॅनर, पोस्टर आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहे. या कमानी बघण्यासाठी अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रत्येक ठिकाणी विविध अनोख्या कमानी बघायला मिळत असून व्यापारपेठेत प्रत्येक दुकानादुकानांसमोर विविध साहित्य वापरून कमानी उभ्या केलेल्या आहेत. यामध्ये रेडिमेड कपड्यांची कमान, भांड्यांची कमान, फळविक्रेत्यांची फळांची कमान असे अनोखे चित्र परळीत पहायला मिळत आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे काल (9 जानेवारी) भगवान गडावर पहिल्यांदाच मंत्री म्हणून दर्शनासाठी गेले होते. याचे औचित्य साधून सौरभ आघाव या कार्यकर्त्याने आपल्या मित्रासोबत तब्बल 174 किलोचा हार बनवला. याच हारातून साहेबांचं अनोखं स्वागत करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एवढा मोठा वजनाचा हार बनवण्यासाठी सौरभने शेख सलीमची मदत घेतली. या फूलवाल्याची शेख सलीम गेल्या 40 वर्षांपासून फुलांचा व्यवसाय करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांच्याकडे तब्बल 144 किलोचा हार तयार करण्याची मागणी आली आहे. ही फूल अहमदनगर मागवण्यात आले आहेत. या एवढा मोठा हार बनवण्यासाठी तब्बल 9 ते 10 तास सलीम यांनी (dhananjay munde felicitation at parli) घातले.