
Dhule Election Result : राज्यात एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. तर दुसरीकडे नगरपंचायत आणि नगपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.एकूण 288 नगराध्यक्षपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत अनेक टिकाणी महायुतीने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडी आघाडीला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी महायुतीच्या घटकपक्षांची सरशी पाहायला मिळत आहे. काही नगरपालिकांत तर निकाल स्पष्ट झाले असून जल्लोषाला सुरूवात झाली आहे. असे असतानाच धुळे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मात्र जबर धक्का बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे.
हाती आलेल्या निकालानुसार शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झालेला आहे. शिवसेना पक्षाला या ठिकाणी खातेदेखील खोलता आलेले नाही. येथे महायुतीधील भाजपा वरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत येथे होती. याच निवडणुकीत भाजपानेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला पाणी पाजलं आहे.
भाजपाचे नेते तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने शिरपूर नरवाडे नगरपरिषदेची निवडणूक लवढली होती. अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या नगरपरिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आलेली आहे. भाजपाचे येथे 31 उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका एमआयएमच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत अमरिशभाई पटेल यांचे सुपुत्र चिंतनभाई पटेल हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे.
दरम्यान, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेसाठी एकूण 32 जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. यातील 31 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर एका जागेवर एमआयएम या पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. चिंतनभाई अमरिशभाई पटेल हे 17 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे येथे भाजपाकडून जल्लोष साजरा केला जात असून गुलालाची उधळण केली जात आहे.