कुणीही कायदा हातात घेऊ नका; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेची मंत्री आणि आमदारांना तंबी

| Updated on: Oct 10, 2022 | 12:14 AM

सरकारला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे कान टोचले आहेत.

कुणीही कायदा हातात घेऊ नका; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेची मंत्री आणि आमदारांना तंबी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. त्यातच आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. तर अनेक ठिकाणी नेते झालेले पहायला मिळत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नका असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना तंबी दिली आहे.

सरकारला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे कान टोचले आहेत.

कुणीही कायदा हातात घेऊ नका अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. टीकेला टिकेने उत्तर देण्याची गरज नसल्याचा सल्ला ही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिला आहे.  शिवाय सरकारने 100 दिवसात केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेले आहेत. तरी, देखील मतदार संघातील कामे होत नाहीत म्हणून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवावर भडकले. यावरुन देखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.