AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस आमदाराला ईडीचा मोठा धक्का, 1392 कोटींना गंडवले, 1.42 कोटी रोकड, 32 बेनामी फ्लॅट आणि बरेच…

बँक व्यवहार फसवणुकीप्रकरणी ईडीने काँग्रेस आमदारावर मोठी कारवाई केली आहे. तीन दिवस ईडीने या आमदारांची कसून चौकशी केली. या चौकशीअंती आमदारांकडून ईडीने मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे.

काँग्रेस आमदाराला ईडीचा मोठा धक्का, 1392 कोटींना गंडवले, 1.42 कोटी रोकड, 32 बेनामी फ्लॅट आणि बरेच...
Congress Mla Rao DansinghImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 21, 2024 | 4:57 PM
Share

हरियाणा राज्यातील महेंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार राव दानसिंह यांच्या घरी आणि कंपनीवर ईडीने धाड टाकली आहे. आमदार राव दानसिंह आणि त्यांच्या मुलगा, सहकारी यांच्या दिल्ली, गुरुग्राम आणि जमशेदपूर येथील 16 जागांवर 18 जुलै रोजी सकाळी धाड घातली. ईडीने सतत तीन दिवस त्यांची चौकशी केली. अखेर ही धाड कारवाई रविवारी संपली. ईडीच्या तपासामध्ये कंपनी आणि आमदारांच्या बँक अकाऊंटमध्ये हेराफेरी झाल्याचे समोर आले. ईडीने केलेय या कारवाईत 1.42 कोटी रोख, काही महत्त्वाची कागदपत्रे, बेनामी 32 फ्लॅट, जमीन, अनेक लॉकर इतकी संपत्ती जप्त केली आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मेसर्स एलाइड स्ट्रिप्स लि.चे संचालक गौरव अग्रवाल, मोहेंदर अग्रवाल आणि आमदार राव दानसिंह, त्यांचा मुलगा अक्षत सिंह यांच्या संस्था, कंपनीवर ईडीने धाड टाकली. याप्रकरणी सीबीआयकडे गुन्हा दाखल झाला होता. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांची अफरातफर, फसवणूक आणि कॅनरा बँकेला 1392 कोटींना गंडवल्याचा आरोप करण्यात आला होता.

राव दानसिंह आणि त्यांच्या मुलाने एएसएल कंपनीतून कर्ज घेतले. परंतु, त्याची परतफेड केली नाही. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकांकडून कोट्यवधीचे कर्ज लाटले. जमीन खरेदी करून गुंतवणूक केली. बँकांकडून घेतलेले कर्ज कंपन्यांमध्ये वापरले. हा सगळा व्यवहार बनावट कंपन्याच्या माध्यमातून करण्यात आला. त्या बदल्यात रोकड, जमीन खरेदी करणे आणि अन्य कामांत कर्जाचा पैसा गुंतवण्यात आला. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे ईडीने सांगितले.

हरियाणा विधानसभेत राव दानसिंह हे महेंद्रगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावर्षाच्या अखेरीला हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राव दानसिंह हे या मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमधून महेंद्रगड जागेवर निवडणूक लढवली होती. परंतु, भाजपाचे धर्मबीर सिंह यांनी त्यांचा 41 हजार मतांनी पराभव केला.

Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?