खात्यात करोडो रुपये आले कसे? पती-पत्नीची एकत्र चौकशी होणार? संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत(Varsha Raut) यांना देखील ईडीने पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी समन्स बजावले(ED summons) आहे. पाच ऑगस्ट रोजीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी होण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे.

खात्यात करोडो रुपये आले कसे? पती-पत्नीची एकत्र चौकशी होणार? संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स
| Updated on: Aug 04, 2022 | 4:29 PM

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) ईडीच्या ताब्यात असतानाच आता त्यांच्या पत्नी देखील अडचणीत येणार आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत(Varsha Raut) यांना देखील ईडीने पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी समन्स बजावले(ED summons) आहे. पाच ऑगस्ट रोजीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी होण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे. यामुळे या प्रकरणात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची एकत्रित चौकशी होऊ शकते अशी माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ED कोठडीमध्ये आहेत. आज त्यांची कोठडी संपली पण पुन्हा एकदा EDने त्यांची कोठडी वाढवून घेतली आहे. गोरेगाव पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा EDने समन्स पाठवले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना सुद्धा ईडी कार्यालयामध्ये बोलवून त्यांचं सुद्धा स्टेटमेंटरेकॉर्ड केले जाणार आहे.

पत्रा चाळ घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका रोल काय?

या सगळ्या प्रकारणामध्ये आपण संजय राऊत यांची कोठडी मिळाल्यानंतर ईडीने केलेल्या तपासात वर्षा राऊत यांचे नाव देखील समोर आले आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले. या कथीत घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका रोल काय सगळ्याचीच ईडी चौकशी करणार आहे.

पत्रा चाळ घोटाळा नेमंका आहे तरी काय?

संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे उकळण्याचा कट रचला आणि त्या 672 भाडेकरूंचे भवितव्य, ज्यांची घरे 10 वर्षांपूर्वी पाडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रवीण राऊत, एचडीआयएल आणि गुरुआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आणखी काही लोकांनाही चौकशीसाठी बोलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी सध्या खरेदी केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या आणखी काही मालमत्ता एजन्सीच्या तपासाखाली आहेत मात्र, राऊत आणि त्यांच्या भावांनी त्याची मालकी नाकारली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

Follow Us