दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई झाली आहे. मात्र, या कारवाईच्या निमित्तामे पुन्हा एकदा संजय राऊतांची प्रॉपर्टी चर्चेत आली आहे. संजय राऊतांच्या नावे बँकेत कोट्यावधीच्या FD आहेत. तर बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट तसेच अलिबागमध्ये जमीनी देखील आहेत. राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना राऊतांनी प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यामुळे आता संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती? याचा हा आढावा.

दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:13 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने(ED)अटक केली आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल साडे तास तासांच्या चौकशी नंतर ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊंताना ताब्यात घेत हा हाय व्होल्टेज ड्रामा संपवला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई झाली आहे. मात्र, या कारवाईच्या निमित्तामे पुन्हा एकदा संजय राऊतांची प्रॉपर्टी चर्चेत आली आहे. संजय राऊतांच्या नावे बँकेत कोट्यावधीच्या FD आहेत. तर बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट तसेच अलिबागमध्ये जमीनी देखील आहेत. राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना राऊतांनी प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यामुळे आता संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती? याचा हा आढावा.

दीड लाख कॅश, दोन रिव्हॉल्वर आणि एक कार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना संजय राऊतांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञा पत्राद्वारे जाहीर केली होती. 1 लाख 55 हजार 772 रूपयांची कॅश आणि बँकेत 1 कोटी 93 लाख 55 हजार 809 रूपये असल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात नमूद केले होते. तसेच आपल्या नावार एक वाहन असून ते 2004 मध्ये खरेदी केल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात लिहीले होते.

पत्नीकडे सोनं 729.30 ग्रॅम सोनं

पत्नी वर्षा यांच्याकडे 729.30 ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात असल्याचे संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद होते. या सर्व दागिण्यांची किंमत 39 लाख 59 हजार 500 रूपये आहे. तर एक लाख 30 हजार रुपयये किंमतीचे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दिगीने आहेत.

बँकेत 3 कोटी 38 लाखांची FD

संजय राऊत यांच्या नावावर बँकेत ठेवा अर्थात FD देखील आहेत. या FD 3 कोटी 38 लाख 77 हजार 666 असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते.

संजय आणि वर्षा राऊत यांची कमाई किती?

मालमत्तेसह संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात कमाई देखील नमूद केली होती. 2020-2021 या वर्षात संजय राऊतांनी 27 लाख 99 हजार 169 रूपये कमावले. तर त्यांच्या पत्नी वर्षा यांची कमाई 21 लाख 58 हजार 790 इतकी दाखवण्यात आली आहे. अलिबाग आणि पालघरमध्ये जमीनी, दादरमध्ये फ्लॅट आणि अवनेक व्यावसायीक अलिबागमध्ये संजय राऊतांच्या नावावर जमीनी आहेत. तर पत्नी वर्षा यांच्या नावावर पालघरमध्ये जमीन आहे. संजय राऊत यांच्या नावे रायगडमध्ये नॉन अॅग्रीकल्चर जमीन देखील आहे. या जमिनीची किंमत साधारण 2.20 कोटी आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दादरमध्ये दोघांच्या नानावर एक एक फ्लॅट आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये राऊतांनी फ्लॅट घेवून ठेवले आहेत.

संजय राऊतांची 11 कोटी 15 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केलेय

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ईडीने अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने ही कारवाई केली होती. संजय राऊतांची एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.