Rajya Sabha Election 2022: निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची चर्चा, राज्यसभेचा जसा निकाल लांबला तसा नाथाभाऊंचा थेट आरोप

| Updated on: Jun 10, 2022 | 9:52 PM

एकनाख खडसे यांनी भाजपवर हल्ला करताना ते केंद्रीय तापासाचा वापर करत असल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले यांचा अक्षेप आणि यांच्या यंत्रणा असल्याचे एकनाख खडसे यांनी भाजपवर टीका केली.

Rajya Sabha Election 2022: निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची चर्चा, राज्यसभेचा जसा निकाल लांबला तसा नाथाभाऊंचा थेट आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाख खडसे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha elections) वातारण गरम होत आहे. आज सकाळपासूनच राज्यसभेच्या निवडणूकीसाठी विधानभवनात सगळे नेते हजेरी लावली आणि मतदानही पार पाडले. मात्र त्यानंतर भाजपकडून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे संतोष कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. तर महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत बाद करण्याची मागणी करण्यात आल्याने हे प्रकरण निवडणूनक आयोगाकडे दिल्लीला गेलं आहे. त्यामुळे आज याचा निकाल लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाख खडसे (NCP leader Eknakh Khadse) यांनी भाजपवर हल्ला करताना भाजप आता केंद्रीय तपास यंत्रणाचा आधार घेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार असल्याची चर्चा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे वक्ततव्य राज्यसभेचा जसा निकाल लांबला तसे केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात घोडेबाजार होणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

यांचाच अक्षेप आणि यांच्याच यंत्रणा

आज राज्यसभेच्या निवडणुक लागली असून मतदानावरून सकाळपासून राजकीय वातावरण गरम झाले होते. तर दुपार पर्यंत मतदान पार पडले. मात्र प्रतिक्षा लागली होती ती निकालाची. याच दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे संतोष कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. तर महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत बाद करण्याची मागणी करण्यात आली. भाजपणे महाविकास आघाडी सरकारवर आणि महाविकास आघाडी सरकारने भाजपवर मतदानवेळी कुरघोडी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. त्यावरून राज्यात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकनाख खडसे यांनी भाजपवर हल्ला करताना ते केंद्रीय तापासाचा वापर करत असल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले यांचाच अक्षेप आणि यांच्याच यंत्रणा असल्याचे एकनाख खडसे यांनी भाजपवर टीका केली.

हे सुद्धा वाचा

तसेच याच्याआधी निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप केला होता. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजाराची चर्चा झाली होती. त्यानंतर आता खडसे यांनी देखील त्यावर री ओढत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची चर्चा असल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजपचा हा रडीचा डाव सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपला या निवडणूका उधळून लावायच्या असल्याचाही आरोप खडसे यांनी केला आहे.