Vaibhav Suryavanshi: कसाईनुमा फलंदाजीनंतर वैभव सूर्यवंशीची किती कमाई, स्फोटक फटकेबाजीने रचला विजय हजारे ट्रॉफीत इतिहास
Vijay Hazare Trophy मध्ये काल बिहारने सर्वच रेकॉर्डचा चिखल केला. बिहारने 574 धावांचा हिमालय उभा केला. त्याचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेश संघाची दमछाक उडाली. बिहार संघाने 397 धावून महाविजय मिळवला. वैभव सूर्यवंशी प्लेअर ऑफ द मॅच ठरला. त्याने 190 धावांची स्फोटक फलंदाजी केली. त्याने या सामन्यात इतकी कमाई केली.

Vaibhav Suryavanshi: विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने विस्फोटक खेळी खेळली. त्याची बॅट तळपली. या डावखुऱ्या खेळाडूने सलामीला येत तुफान बॅटिंग केली. त्याने केवळ 84 चेंडूत 190 धावांचा डोंगर उभा केला. त्याने या डावात 15 षटकार आणि 16 चौकार लगावले.वैभव सूर्यवंशीच्या तुफान खेळीने बिहारने 50 षटकात 574 धाव केल्या. हा एक जागतिक विक्रम आहे. बिहारने हा सामना 397 धावांनी जिंकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर (Player of the Match) किताब मिळाला. या सामन्यातून वैभव सूर्यवंशीने इतकी कमाई केली आहे.
गोलंदाजांचा घाम काढला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांचा घाम काढला.त्याने अरुणाचल प्रदेश संघाविरोधात 84 चेंडूवर 190 धावा चोपल्या. वैभव सूर्यवंशीने या डावात आतापर्यंत 226.19 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजाने धुवून काढले.त्याने 16 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने धावांचा डोंगर उभा केला.त्याच्या या दमदार फटकेबाजीने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.त्याच्या फलंदाजीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्याला टीम इंडियात स्थान देऊन आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवावे असी मागणी करण्यात येत आहे.
वैभव सूर्यवंशीची किती कमाई?
वैभव सूर्यवंशीला विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात, सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.त्याला दहा हजारांचा धनादेश सोपविण्यात आला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या BCCI ने या टुर्नामेंटसाठी इतकी कमी रक्कम दिल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या खेळीने त्याचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये घेतल्या जात आहे. त्याच्याकडून भारताचा ऑलराऊंडर म्हणून पाहिल्या जात आहे.
बिहारला नाही तोडता आला रेकॉर्ड
बिहारच्या टीमने अरुणाचल प्रदेश संघाला 397 धावांनी हरवले आहे. ए यादीत हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. वर्ष 2022-23 हंगामात तामिळनाडू संघाने अरुणाचल प्रदेश संघाविरोधात 435 धावांचा विजय नोंदवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये 343 धावांनी एकदिवशीय सामना जिंकण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. बिहारने जागतिक रेकॉर्ड नोंदवला नाही. पण वैभवच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवल्या गेला आहे. वैभव सूर्यवंशीने केवळ 14 वर्ष, 272 दिवसांच्या वयात असताना शतक ठोकले. हा एक जागतिक रेकॉर्ड आहे. त्याच्याविषयी जगभरात कुतुहल आहे. याशिवाय वैभवने यादी ए मध्ये सर्वात गतिमान 150 धावांचा विक्रम नावावर नोंदवला आहे. त्याने केवळ 59 चेंडूत 150 धावा करत एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड तोडला आहे.
