AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: 15 षटकार आणि 16 चौकारचा पाऊस, वैभव सूर्यवंशीची कसाईनुमा फटकेबाजी, 84 चेंडूवर चोपले 190 रन

Vaibhav Suryavanshi Record: भारताचा 14 वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकले. रांची खेळलेल्या सामन्यात त्याच्या स्फोटक फलंदाजीने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वैभव सूर्यवंशीने 84 चेंडूत 190 धावा केल्या.

Vaibhav Suryavanshi: 15 षटकार आणि 16 चौकारचा पाऊस, वैभव सूर्यवंशीची कसाईनुमा फटकेबाजी, 84 चेंडूवर चोपले 190 रन
कसाईनुमा फटकेबाजी
| Updated on: Dec 24, 2025 | 2:42 PM
Share

Vijay Hazare Trophy: भारताचा सर्वात तरुण आणि स्फोटक 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीत तुफान आणलं आहे. अरुणाचल प्रदेश संघाविरोधातील रांची येथील मैदानावरील सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने 84 चेंडूवर 190 धावा चोपल्या. वैभव सूर्यवंशीने त्याच्या डावात आतापर्यंत 226.19 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 16 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या दमदार फटकेबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याच्यासमोर गोलंदाजांना नुसता घाम गाळावा लागला. बिहारच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी करत अरुणाचल प्रदेश संघाचा सूर्य अस्त केला. या संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली.

List-A मधील सर्वात वेगवान शतक

वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरोधात केवळ 36 चेंडूत शतक ठोकले. ए यादीत, एखाद्या भारतीय खेळाडूने ठोकलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. ए संघात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम पंजाब संघाचा अनमोलप्रित सिंह याच्या नावावर आहे. त्याने 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशविरोधात 35 चेंडूत शतक ठोकले होते. तर अवघ्या एक चेंडू शिल्लक खेळत अरुणाचल प्रदेश संघाविरोधातच वैभव सूर्यवंशी याने शतक ठोकले. ए यादीत सर्वाधिक वेगवान शतक ठोकण्याचा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेजर-मॅक्गर्क याच्या नावे आहे. त्याने 2023-24 च्या हंगामात दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी तस्मानियाविरोधात केवळ 29 चेंडूत शतक ठोकले आहे.

आता टीम इंडियात आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवा

वैभव सूर्यवंशी सातत्याने दमदार खेळी खेळत आला आहे. त्याने गेल्या एका वर्षात स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने अनेकदा षटकार-चौकारांची सलामी दिली आहे. त्याच्या चेंडूला सीमा रेषे पार जाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांना जशी कमी वयात आंतरराष्ट्रीय सामन्यात उमेदवारी देण्यात आली. तशीच संधी वैभव सूर्यवंशीला देण्याची मागणी होत आहे. जर त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळला तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वैभव सूर्यवंशी हा डावखूरा स्फोटा फलंदाज म्हणून ओळखल्या जातो.इतकेच नाही तर तो डाव्या हाताने चेंडू लिलया फेकतो. तो डावखूरा फिरकी पटू आहे.

35 चेंडूत IPL मध्ये शतक

वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 14 व्या वर्षी IPL मध्ये कसाईनुमा फलंदाजी केली होती. 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरोधातील IPL सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 35 चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यवंशीने IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकले. राजस्थान रॉयल्स संघाने वैभव सूर्यवंशी याला IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 1.10 कोटी रुपयांना खरेदी केली होते. वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमधील आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी