AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryawanshi: वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या अडचणीत वाढ! BCCI मोठा निर्णय घेणार? पराभवाचे खापर कुणावर फुटणार?

Vaibhav Suryawanshi-Ayush Mhatre: भारताच्या 19 वर्षाखालील संघाला अतिआत्मविश्वास नडला. पाकिस्तानकडून 191 धावांचा महापराभव हा खोलवर जखम करुन गेला. आता या पराभवामुळे BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यातील खेळाडूंचे वर्तन आणि त्यांची कामगिरी ऐरणीवर आली आहे. काय करणार बीसीसीआय कारवाई?

Vaibhav Suryawanshi: वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या अडचणीत वाढ! BCCI मोठा निर्णय घेणार? पराभवाचे खापर कुणावर फुटणार?
वैभव सूर्यवंशी, आयुष्य म्हात्रे
| Updated on: Dec 23, 2025 | 4:42 PM
Share

BCCI to Review India U19 Team: 19 वर्षांखालील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरोधात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने 191 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव केला. या टुर्नामेंटमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी बजावली. पण अंतिम सामन्यात संपूर्ण संघच ढेपाळला. या सामन्यातील खेळाडूंची कामगिरी आणि त्यांचे वर्तन यावरुन वाद ओढावला. आता कर्णधार आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी याच्यासह संघातील इतर खेळाडूंवर BCCI मोठ्या कारवाईची शक्यता आहे. या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बीसीसीआय अंतिम सामन्यात पराभव का झाला, त्यात कुणी सर्वात वाईट कामगिरी बजावली याची समीक्षा करणार असल्याचे समोर येत आहे.

BCCI करेल टीम इंडियाच्या कामगिरीची समीक्षा

क्रिकबजने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, BCCI, भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या महापराभवाची समीक्षा करेल. ॲपेक्स परिषदेच्या बैठकीत याविषयीवर चर्चा होणार आहे. संघ व्यवस्थापनाकडून याविषयीचे उत्तर घेतल्या जाईल. संघाचे व्यवस्थापक सलील दातार याविषयीचा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. याशिवाय BCCI हेड कोच ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे सोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

खेळाडूंच्या वर्तनावर चर्चा

सर्वसामान्य समीक्षा धोरणापेक्षा बीसीसीआय थोडी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. अखेरच्या सामन्यात खेळाडूंच्या वर्तनाची मोठी चर्चा झाली. पाकिस्तानी संघातील खेळाडूंची शिवीगाळ आणि त्याला भारतीय खेळाडूंनी दिलेले उत्तर, भारतीय खेळाडूंचे वर्तन याची समीक्षा होणार आहे. अर्थात याविषयी काय चर्चा होईल आणि काय कारवाई करण्यात येईल याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जानेवारी -फेब्रुवारी 2026 मध्ये

अंडर 19 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. या कारणामुळे BCCI या अडचणींवर मात करण्याविषयी विचार करत आहे. आगामी विश्वचषकात या संघाने दमदार कामगिरी करावी यासाठी आताच त्यांच्या कामगिरीची समीक्षा करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने चाहत्यांना निराश केले. त्यातच पाक संघाच्या खेळाडूंशी नाहक हुज्जत घालून मानसिक संतुलन गमाविल्याचे अनेकजणांचे मत आहे. पाक संघातील खेळाडूंची भारतीय खेळाडूंना डिवचन दबावात आणण्याची रणनीती यामुळे यशस्वी ठरल्याचा दावाही काही समीक्ष करत आहेत. त्यादृष्टीने खेळाडूंची मानसिक तयारी करणे अत्यावश्यक झालं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...