AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : आता हेच जंतर-मंतर! अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकार टार्गेटवर; थेट जमिनीवर बसून…

जोपर्यंत परीक्षा पुन्हा होईल असे आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. इथेच आंदोलन करायचं. मीदेखील तुमच्यासोबत असेल. आता हेच जंतर-मंतर,' अस म्हणत दीपके यांनी एका प्रकारे आपल्या नव्या आंदोलनाचीच घोषणा केली.

Abhijeet Dipke : आता हेच जंतर-मंतर! अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकार टार्गेटवर; थेट जमिनीवर बसून...
abhijeet dipke protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 6:09 PM
Share

CJP Abhijeet Dipke : बॉंबे हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ उडाला आहे. आज (16 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परीक्षेच्या ठिकाणी जाऊन दीपके हेदेखील आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे या परीक्षेतील कथित गोंधळाची राज्यभरात चर्चा होत आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी आता हेच जंतर-मंतर असल्याचे सांगून आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

दीपके काय म्हणाले?

लिपीक पदाच्या परीक्षेत गोंधळ उडाल्याचे समजताच अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, ते समजून घेतले. विद्यार्थ्यांनीही आपली संपूर्ण व्यथा मांडली. ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जावी, ज्या तांत्रिक अडचणी आल्या त्या भविष्यात यायला नकोत, अशा काही मागण्या विद्यार्थ्यांनी दीपके यांच्यापुढे मांडले. दीपके यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले तसेच आता इथेच आंदोलनाला बसायचं. जागेवरून उठायचं नाही, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

आता हेच जंतर मंतर

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘जोपर्यंत परीक्षा पुन्हा होईल असे आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. इथेच आंदोलन करायचं. मीदेखील तुमच्यासोबत असेल. आता हेच जंतर-मंतर,’ अस म्हणत दीपके यांनी एका प्रकारे आपल्या नव्या आंदोलनाचीच घोषणा केली. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना दीपके यांनी लवकरच जंतर मंतर आंदोलन सीझन 2 सुरू करणार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर आता दीपके हे संभाजीनगरात आंदोलनाला बसले आहेत. सोबतच राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी हा गोंधळ उडाला आहे, तिथे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच बसून राहावे, असेही आवाहन दीपके यांनी केले आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता