मला, बावनकुळे, तावडेंना डावलल्याचा फटका, बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा उद्रेक

| Updated on: Nov 27, 2019 | 11:48 AM

भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या मंत्र्यांना भाजपने तिकीट नाकारलं होतं.

मला, बावनकुळे, तावडेंना डावलल्याचा फटका, बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा उद्रेक
Follow us on

मुंबई : हेतूपुरस्सर मला, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे निश्चितच पक्षाला फटका बसला, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपला महाराष्ट्रातून सत्ता गमवावी लागल्यानंतर खडसेंचा (Eknath Khadse on Devendra Fadnavis) उद्रेक झाला. अजित पवार यांच्या विरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत, अशी आगपाखड खडसेंनी केली.

हेतूपुरस्सर मी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे निश्चितच पक्षाला फटका बसला. आम्हाला सोबत घेऊन चालला असतात, तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता. याचा जाब आम्ही वेळोवेळी पक्षाला विचारलेला आहे, वरिष्ठांना विचारलेला आहे, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त केला.

वर्षानुवर्ष काम केलेल्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचं जनमानसात चित्र आहे. सर्वांनी एकत्र काम केलं तर पक्षाला बळ मिळतं. पक्षात नवीन आणलेल्यांना तिकीट दिल्याचाही फटका बसला. पार्टी विथ डिफरन्स या भाजपच्या बिरुदाला, भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेला धक्का पोहचला. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना सोबत घ्यायला नको होतं, असं माझं मत असल्याचं खडसे म्हणाले.

2014 मध्ये युती तोडण्याचा सामूहिक निर्णय झाला होता. पण विरोधपक्ष नेता म्हणून ते जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सहा महिन्यांनी चूक दुरुस्त करत सेना-भाजप सरकारमध्ये एकत्र आलं. 2019 मध्ये महायुतीला मतदान करत जनतेने 161 आमदारांना निवडून आणत सेना-भाजपला बहुमत दिलं. परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्रिपद कोणाला आणि किती वर्ष यावर एकमत न झाल्याने सेना-भाजप वेगळे झाले, असं खडसे म्हणाले.

भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या मंत्र्यांना भाजपने तिकीट नाकारलं होतं. खडसेंऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांनाही पराभवाचा धक्का बसला.

अचानक आलेल्या फोननंतर सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर

पत्ता कट झालेल्या भाजपचे तत्कालीन आमदार

भाजप – 22

शहादा, नंदुरबार – उदेसिंह पाडवी (भाजप)
चाळीसगाव, जळगाव – उन्मेष पाटील (भाजप)
मुक्ताईनगर, जळगाव – एकनाथ खडसे (भाजप) – मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट
मेळघाट, अमरावती – प्रभूदास भिलावेकर (भाजप)
नागपूर दक्षिण, नागपूर – सुधाकर कोठले (भाजप)
कामठी, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
तुमसर, भंडारा – चरण वाघमारे (भाजप)
भंडारा, भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप)
tv9marathi.com
साकोली, भंडारा – बाळा काशिवार (भाजप)
आर्णी, यवतमाळ – राजू तोडसाम (भाजप)
उमरखेड, यवतमाळ – राजेंद्र नजरधने (भाजप)
विक्रमगड, पालघर – विष्णू सावरा (भाजप) – मुलगा हेमंत सावरा यांना तिकीट
कल्याण पश्चिम, ठाणे – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप) – शिवसेनेला जागा
बोरीवली, मुंबई – विनोद तावडे (भाजप)
मुलुंड, मुंबई – सरदार तारासिंह (भाजप)
tv9marathi.com
घाटकोपर पूर्व, मुंबई – प्रकाश मेहता (भाजप)
कुलाबा, मुंबई – राज पुरोहित (भाजप)
शिवाजीनगर, पुणे – विजय काळे (भाजप)
कोथरुड, पुणे – मेधा कुलकर्णी (भाजप) – चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी
माजलगाव, बीड – आर. टी. देशमुख (भाजप)
केज, बीड – संगिता ठोंबरे (भाजप) – आयात नमिता मुंदडा यांना तिकीट
उदगीर, लातूर – सुधाकर भालेराव (भाजप)

Eknath Khadse on Devendra Fadnavis