AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक आलेल्या फोननंतर सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule walk outs) या अचानक विधानभवनातून धावत गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अचानक आलेल्या फोननंतर सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 27, 2019 | 10:39 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule walk outs) या अचानक विधानभवनातून धावत गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule walk outs) सकाळपासून विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत करत होत्या. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेऊन, अजित पवारांच्या पाया पडून, आमदारांना हस्तांदोलन करुन सुप्रियांनी सर्वांचं स्वागत केलं. मात्र त्यांना अचानक फोन आला आणि त्या धावत विधानभवनातून निघून गेल्या.

सुप्रिया सुळे यांना नेमका कोणाचा फोन आला, फोनवरुन त्यांना काय माहिती मिळाली याबाबत अद्याप काहीच माहिती उपलब्ध नाही. फोन आल्यानंतर सुप्रिया सुळे तातडीने धावत विधानभवनातून निघाल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. नेमकं काय घडलंय याचा अंदाज कोणालाही बांधता आला नाही.

सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत

सर्वपक्षीय नवर्निवाचित आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधीमंडळाच्या गेटवर उभ्या होत्या. विधीमंडळात पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं, तर मोठे बंधू अजित पवार यांना मिठी मारत त्या पाया पडल्या होत्या.

गेला महिनाभर आमदारांच्या मनात धाकधूक आणि ताण होता. तो घालवण्यासाठी आपण स्वतः विधीमंडळात आल्याचं सुप्रिया सुळेंनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते.

अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुळेंनी दिली होती. सुप्रिया सुळे यांनीही दादाला परत येण्यासाठी भावनिक साद घातली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर (Supriya Sule Greets Ajit Pawar) केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ (Maharashtra MLA Oath Ceremony) देत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शपथविधी सुरु झाला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली