यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच’ करत बसावं लागणार, खडसेंचा फडणवीसांना टोला

| Updated on: Feb 04, 2021 | 10:15 AM

जयंत पाटलांच्या संवाद यात्रेसाठी जळगावात आढावा बैठक घेतली असताना खडसेंनी फडणवीसांना टोमणा मारला. (Eknath Khadse taunts Devendra Fadnavis)

यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागणार, खडसेंचा फडणवीसांना टोला
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

जळगाव : कार्यकर्त्यांना थोपवून धरण्यासाठी आपलं सरकार येणार आहे, असं विरोधक सांगत राहतात, मात्र महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागणार, अशा शब्दात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. (Eknath Khadse taunts Devendra Fadnavis over Me Punha Yein)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ सुरु आहे. जयंत पाटलांच्या संवाद यात्रेसाठी एकनाथ खडसे यांनी जळगावात आढावा बैठक घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसेंनी भाजप आणि फडणवीसांना टोमणा मारला.

“महाविकास आघाडी सरकार टिकणार”

“राज्याचं राजकारण बदलत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता पाय रोवत आहे. समोरच्यांना कितीही वाटत असेल, हे सरकार पडणार आहे, हे सरकार जाणार आहे, तरी हे सरकार टिकणार आहे, सरकार चालणार आहे.” असं एकनाथ खडसे म्हणाले.

“यांना मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल

“कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये, म्हणून काही गोष्ट कराव्या लागतात. कार्यकर्ते थांबवून ठेवण्यासाठी, अरे बाबा सरकार येणार आहे जाऊ नकोस, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे, हे सरकार पडणार आहे, असं सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्ते थोपवून धरण्यासाठी वारंवार केला जातो. आता वर्ष उलटलं, अशीच पाच वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल.” असं खडसे म्हणताच कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये खसखस पिकली.

फडणवीसांवर खडसेंचे निशाणे

माझा भाजपला विरोध नव्हता. भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला. एका व्यक्तीमुळे आपलं नुकसान झालं, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा अशी असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर केली होती. भाजपमध्ये असतानाही खडसेंचे फडणवीसांवर हल्लाबोल सुरुच असायचे. मात्र राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंनी अधिक जोमाने फडणवीसांना लक्ष्य केले.

संबंधित बातम्या:

भाजप खासदार सूनबाईंकडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती ‘हम करे शो कायदा; खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला

(Eknath Khadse taunts Devendra Fadnavis over Me Punha Yein)