Eknath Shinde : ‘मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच लढतोय’ एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्वीट करुन महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय.

Eknath Shinde : मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच लढतोय एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन
एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 25, 2022 | 10:02 PM

मुंबई : एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जातोय. त्याचवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्वीट करुन महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) खेळ ओळखा. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जातोय. राज्यात शिवसैनिकही बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं हे ट्वीट महत्वाचं मानलं जात आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना अजून एक संधी?

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना शिवसेना नेतेपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बैठकीत असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शिंदे आणि कदम हे दोघेही शिवसेनेच्या नेतेपदावर अद्यापही कायम आहेत. त्यामुळे शिवसेना अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडात रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदमही सहभागी आहेत. तसंच रामदास कदम हे देखील शिवसेनेत नाराज आहेत. तसंच मधल्या काळात एका कथित ऑडिओ क्लिपवरुन उद्धव ठाकरे हे देखील कदम यांच्यावर नाराज आहेत. अशास्थितीत या दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार असं सांगितलं जात होतं. पण शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत असा कुठलाही निर्णय झाला नाही.

“बाळासाहेबांचं नाव वापराल तर याद राखा”

बाळासाहेब ठाकरे नाव वापरणाऱ्या शिंदे गटाला उद्धव ठाकरे कार्यकारिणी बैठकीतून खडसावलं आहे. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.