Eknath Shinde : दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

| Updated on: Aug 19, 2022 | 4:29 PM

Eknath Shinde on Shivsena : दीड महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले होते, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी शिवसेनेवर सोडलं आहे.

Eknath Shinde : दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेवर टीकास्त्र
Follow us on

ठाणे : ‘दीड महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले होते,’ असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेवर (Shivsena) सोडलंय. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी (Dahi handi) उत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बालगोपालांचे कौतुक केले. दहीहंडीनिमित्त टेंभी नाका याठिकाणी दिग्गजांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. तर अभिनेत्री श्रद्धा कपूरला देखील विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडी ‘प्रो दहीहंडी’ म्हणून पुढील वर्षी सुरू होईल. सरकारी नोकरीत यामध्ये सहभागी होणाऱ्यांना 5 टक्के आरक्षण दिलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा धर्मवीर आनंद दिघे यांनी बोलून दाखवल्याचं त्यांची बहिण अरुणाताई यांनी सांगितल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी जाहीर कार्यक्रमात म्हणालेत.

‘आम्ही 50 थर लावले’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. ‘तुम्ही दहीहंडी फोडताय. आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी हंडी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं फोडली. आम्ही 50 थर लावले होते. सूरत टू गुवाहाटी, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनेवर केलीय.

नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री? पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक आठवण सांगितली. धर्मवीर आनंद दिघे यांची ही आठवण आहे. राज्याचा मुख्यमंत्री हा ठाण्याचा व्हावा, अशी इच्छा धर्मवीर आनंद दिघे यांची होती, असं त्यांच्या बहिणीनं सांगितल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवात सांगितलं.

नोकरीत 5 टक्के आरक्षण

दहीहंडी हा क्रीडा प्रकार होणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. दहीहंडी प्रो दहीहंडी म्हणून पुढील वर्षी सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

‘दोन वर्ष निर्बंधात जगलो’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की, ‘मागचे दोन वर्ष निर्बंधात जगलो. आता सगळं सुरळीत झालं आहे. आपण सर्वांनी काळजी घ्या, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणालेत. सगळेच मंदिरं सुरू झाली असून उत्साह असाच राहू द्या, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह

राज्यात सध्या दहीहंडीचा उत्साह आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दहीहंडीनिमित्त मोठं मोठे मनोरे रचले जातायत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसह राज्यभरात दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. दहीहंडीनिमित्त टेंभे नाका याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी बालगोपालांचं कौतुक केलं.