Eknath Shinde : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना होत नाहीत?, एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट

| Updated on: Jun 27, 2022 | 12:17 PM

पुन्हा एकदा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? अशा अशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

Eknath Shinde : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना होत नाहीत?, एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट
एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई:  पुन्हा एकदा शिवसेनेचे (Eknath Shinde) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabne) यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे साहेबांना विचारला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबतच आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांना अटक केल्यानंतर याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. शिंदे यांच्या या ट्विटची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

 

हे सुद्धा वाचा

 दाऊदशी संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करते?

दरम्यान यापूर्वी देखील एक भावनिक ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले होते. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर. असं एकनाथ शिंदे यांनी रविवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते. एकनाथ शिंदेकडून एकापाठोपाठ एक ट्विट करत शिवसेनेला प्रश्न विचारले जात असल्याचे पहायला मिळत आहे.

कोण आहेत सुभाष साबणे?

सुभाष साबणे हे पूर्वीचे शिवसेना नेते आहेत. नादेडमध्ये काँग्रसकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे अशी मगणी सुभाष साबणे यांनी सर्वप्रथम केली होती. काँग्रेसच्या नेत्यांची राजकारणात पीएचडी झाली आहे, त्यांचे डावपेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळत नाहीत असे साबणे यांनी म्हटले होते. मात्र या सर्व प्रकारात सामान्य शिवसैनिकांची कोंडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले. शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली.

भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश का दिले?

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत 1992- 93 साली धार्मिक दंगली उसळल्या. या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी उघड-उघड हिंदुत्त्वाची भूमिका घेतली होती. बाळासाहेबांची प्रक्षोभक भाषणंच या दंगलींना कारणीभूत ठरले असा आरोप तेव्हा करण्यात आला. त्यानंतर 1995 साली झालेल्या विधासभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाचे युती सरकार सत्तेत आले. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या दंगलीची चौकशी करण्यासाठी श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक केली होती. मात्र या आयोगाने सादर केलेल्या अहवालात या दंगलीचा ठपका बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच ठेवण्यात आला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. मात्र राज्यात युतीचे सरकार असल्याने या प्रकरणाला म्हणावी अशी गती मिळू शकली नाही. त्यानंतर 1999 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली. छगन भुजबळ हे गृहमंत्री झाले. त्यानंतर ही श्रीकृष्ण आयोगाची फाईल त्यांच्या टेबलावर आली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले.