AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला…

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार यांचेही खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे, आता यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला...
Eknath Shinde Comment on Sharad Pawar NCP MPImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 15, 2026 | 3:51 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच काल एकनाथ शिंदे आणि या सर्व खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर शरद पवार यांच्या पश्राचेही खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

शरद पवारांचे एनडीएमध्ये स्वागत करणार?

राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचे एनडीएमध्ये स्वागत कराल का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना शिंदे यांनी म्हटले की, NDA चा निर्णय घेणारे अमित शाह आणि पंतप्रधान मोदी आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा याचा निर्णय ते घेतील.

पवारांचे खासदार शिवसेनेत?

पुढे शरद पवार यांच्या पक्षातील खासदार शिवसेनेत येण्याच्या चर्चेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार यांच्या कोणत्याही खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही, तसेच मीही कोणाशी संपर्क साधलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे सध्या तरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार पक्षांतराच्या मनस्थितीत नसल्याचे समोर आले आहे.

शरद पवारांसोबतच्या भेटीवर भाष्य

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मंत्रालयात भेट झाली होती. याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या आमदारांशी चर्चा करायची होती, हे मला समजले आणि मी गेलो आणि भेटलो. ती आपली संस्कृती आहे, काही लोकांना विकृती आहे. दालन काय आमच्या नावावर आहे का? ज्या शरद पवारांचे खाता आणी त्यांनाच बोलता. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. एकमेकांना भेटण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही संस्कृती जपतो पण काही लोकांना विकृती झाली आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक