Aaditya Thackeray: तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंबाबत पहिल्यांदाच गौप्यस्फोट, 20 मे रोजी काय झालं?

20 जून रोजी शिवसेनेतील 22 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले असले तरी 20 मे रोजीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबद विचारणा झाली होती. एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री यांनी तुम्हाला मुख्यंमत्री व्हायचे आहे का? असे विचारले होते.

Aaditya Thackeray: तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंबाबत पहिल्यांदाच गौप्यस्फोट, 20 मे रोजी काय झालं?
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 2:52 PM

मुंबई : 20 जून रोजी (Shivsena) शिवसेनेतील आमदारांनी बंड केले असले तरी बरोबर त्याच्या महिन्याभरापूर्वीच घडलेल्या एका घटनेचा आता (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांची त्यावरील भूमिका काय होती याचे दर्शन राज्याला घडणार आहे. 20 मे रोजीच मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का अशी विचारणा केली होती. तेव्हा मात्र, यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. हा गौप्यस्फोट पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

बंडाच्या एक महिना आगोदर काय घडलं?

20 जून रोजी शिवसेनेतील 22 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले असले तरी 20 मे रोजीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबद विचारणा झाली होती. एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री यांनी तुम्हाला मुख्यंमत्री व्हायचे आहे का? असे विचारले होते. मात्र, त्यावेळी देखील आमदारांच्या निधीचे रडगाणे केले, शिवाय ही फाईल उघडली ती फाईलमध्ये नावे घातली असे सांगून टाळाटाळ केली. एवढे होऊनही बरोबर महिन्यानी शिंदे यांनी हे बंड केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 22 आमदारांना घेऊन केलेल्या बंडातील आमदारांचा आकडा आता 40 वर गेला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.

शिंदेच्या मनात कोणती भीती?

मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊनही त्यांनी याबाबत टाळाटाळ केली. आमदारांची नाराजीचे कारण सांगणाऱ्या शिंदे यांना ईडी च्या कारवावाईची भीती होती का असा अप्रत्यक्ष सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कारण ज्यावेळी ही ऑफर शिंदे यांना देण्यात आली तेव्हा सुध्दा टाळाटाळ करीत ही फाईल उघडली, त्या फाईलमध्ये माझे नाव अशी कारणे शिंदे यांनी सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

आमदार संपर्कात पण गद्दारांना क्षमा नाही

आज बंडखोरांच्या संख्येत वाढ झाली असली तरी यामागची अनेक कारणे याला जबाबदार आहेत. हा पक्षाचे चिन्ह तर सोडाच पण एकसंघाने राहू देखील शकणार नाहीत. शिवाय हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडुण येऊन दाखवावे असे आव्हानाच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाने या बंडखोर आमदारांना काय-काय दिले याचा पाढाच वाचून दाखविला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.