AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray: गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिज्ञा, वाचा भाषणातील TOP 10 मुद्दे..

हिंमत असेल तर तुमच्या बापाचे नाव वापरा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शनिवारी एकनाथ शिंदेचा बाप काढला होता. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी तर हे बंड मोडित काढण्याची प्रतिज्ञाच केली आहे.

Aaditya Thackeray: गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिज्ञा, वाचा भाषणातील TOP 10 मुद्दे..
| Updated on: Jun 26, 2022 | 2:34 PM
Share

एकनाथ शिंदेचे बंड मोडून तोडून टाकण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत. हिंमत असेल तर तुमच्या बापाचे नाव वापरा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी(uddhav thackeray) शनिवारी एकनाथ शिंदेचा(Eknath Shinde) बाप काढला होता. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) तर हे बंड मोडित काढण्याची प्रतिज्ञाच केली आहे. शिवसेनेने आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.

आदित्य ठाकरेंच्या भाषणातील टॉप टेन मुद्दे

  1.  20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
  2. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती.
  3.  यानंतर 20 जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केले.
  4. संदिपान भुमरे, संजय शिरसाट, जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला असा खळबळजनक दावाही आदित्य यांनी भाषणात केला आहे.
  5. धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार. शिवसेनेवरचे प्रेम आपलेच राहणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी यांनी एकनाथ शिंदेनी स्थापन केलेल्या नविन गटाच्या वैधतेबाबतही भाष्य केले आहे.
  6. एकनाथ शिंदे गटाकडे भाजपात किंवा प्रहारमध्ये विलिन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचा स्वतंत्र गट होऊ शकणार नाही असेही आदित्य आपल्या भाषणात म्हणाले.
  7. या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही अशी थेट धमकीच आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे दिली आहे.
  8. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या असे चॅलेंजही आजित्य ठाकरे यांनी दिले आहे.
  9. दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. मात्र ते या बंडखोर गटासोबत कसे जाऊ शकतात, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
  10. 15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही असेही आदित्य ठाकरेंनी ठणकावले. अडीच वर्षे या सगळ्यांचे हिंदुत्व कुठे होते? हिंदुत्वातील ‘ह’ ही नव्हता असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केली.

किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

माननीय उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतला म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल सांगा, आपल्या प्रवक्त्यांनी किरीट सोमैयांना भडवा, चुत्या म्हणावं पण 19 बंगल्यांचा घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार. आपले सुपुत्र आदित्य ठाकरें यांनी नंदकिशोर चतुर्वेदी कडून जे कोट्यवधी रुपयेच मनी लॉंडरींग केलं आहे. आपला साला/मेव्हणा श्रीधर पाटणकर चे कोट्यवधी रुपयांचे डझनभर फ्लॅट जप्त झाले आहे. त्याचा हिशोब तर द्यावाच लागणार.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.