Eknath Shinde : ढुं**ला पाय लावून पळाला, गुलाबराव पाटलांवर राऊतांची सडकून टीका; संदीपान भुमरेही टार्गेटवर

महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

Eknath Shinde : ढुं**ला पाय लावून पळाला, गुलाबराव पाटलांवर राऊतांची सडकून टीका; संदीपान भुमरेही टार्गेटवर
गुलाबराव पाटील/संजय राऊत/संदिपान भुमरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:45 PM

मुंबई : गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळाला, अशी सडकून टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. दहीसरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेनेत आता एकच वाघ उरलाय, असा गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) अविर्भाव होता. आता ढुंगणाला पाय लाऊन पळाला. हा आधी पानटपरी चालवायचा. आता पुन्हा त्याला पानटपरी चालवायला पाठवा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. हा संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. मोरेश्वर सावेंचे तिकीट कापून त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिले, की हा साधा शिवसैनिक आहे, मात्र यांनी दगा दिला असे संजय राऊत म्हणाले.

‘कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे’

गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

हे सुद्धा वाचा

‘ते अश्रु खोटे होते’

संदिपान भुमरे या साखर कारखान्यातील वॉचमनला बाळासाहेबांनी तिकीट दिले, साधा शिवसैनिक आहे म्हणून. हा प्रथम मुंबईत आला, याला साधा वडा सांबार खाता येत नव्हता. तो जमिनीवर बसून हॉटेलात वडासांबार खात होता. आज तो कॅबिनेट मंत्री झाला. त्यानंतर तो उद्धव साहेबांना भेटला, माझ्याकडे आला. शिवसेनेमुळे मी झालो वगैरे वगैरे म्हणत रडायला लागला. ते कसे खोटे अश्रु होते, हे आज कळायला लागले आहे, असे संजय राऊत म्हणाले. हे सगळे धुंदीत आहेत. त्यांच्यावर कोणती नशा आहे, हे तुम्ही व्हिडिओत पाहिले, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. तर हे संकट नाही. याला मी संकट मानत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटील, संदिपान भुमरेंवर काय टीका केली?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.