Sanjay Raut : वेळ पडली तर झेंडा खिशात अन् दांडा बाहेर, हे काय म्हणाले संजय राऊत?

बंडखोरांच्या विरोधात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहे. शिवाय त्यांची भूमिका ही पक्षाला शोभणारीच आहे. खऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब यांची शिकवण आहे. त्यामुळे खांद्यावर असलेला भगवा तो खिशात ठेऊन दांडा बाहेर काढेल म्हणत बंडखोरांबाबत काय होऊ शकते याचे संकेतच दिले आहेत.

Sanjay Raut : वेळ पडली तर झेंडा खिशात अन् दांडा बाहेर, हे काय म्हणाले संजय राऊत?
खा. संजय राऊत
राजेंद्र खराडे

|

Jun 26, 2022 | 1:19 PM

मुंबई : बंडखोरांमुळे (Shivsena) शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान होत असून पक्षाला सावरण्यासाठी आता ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. (Rebel MLA) बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे खरा शिवसैनिक कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, खरा शिवसैनिक कोण हे (Sanjay Raut) संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पटवून दिले आहे. पाठीत खंजीर खुपसणारे केव्हाच शिवसैनिक होऊ शकत नाही. ज्या पक्षामुळे सर्वकाही मिळाले त्याच पक्षाशी आज हे गद्दारी करीत आहे. खरा शिवसैनिक असा असूच शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक वेळ पडली तर भगवा खिशात घालून दांडा बाहेर काढेल असे म्हणत एका वाक्यात अनेक घाव संजय राऊतांनी बंडखोरांवर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत चर्चेपर्यंत असलेला विषय आता रस्त्यावर उतरण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. काळाच्या ओघात बंडखोर आणि शिवसेना यामधील दरी अधिकच वाढत आहे.

बंडखोरांना अप्रत्यक्ष इशाराच

बंडखोरांच्या विरोधात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहे. शिवाय त्यांची भूमिका ही पक्षाला शोभणारीच आहे. खऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब यांची शिकवण आहे. त्यामुळे खांद्यावर असलेला भगवा तो खिशात ठेऊन दांडा बाहेर काढेल म्हणत बंडखोरांबाबत काय होऊ शकते याचे संकेतच दिले आहेत. सध्या राज्यभर बंडखोर आमदारांबद्दल निदर्शने केली जात आहेत. कुणाचे कार्यालये फोडली जात आहेत. अशातच राऊतांनी केलेले हे विधान हे वेगळाच संदेश देणारे आहे.

सर्वकाही शिवसेनेमुळेच, गद्दारांना आता विसर

शिवसेना या चार अक्षरामुळे आज सर्वकाही मिळालेले आहे. जी ताकद, पैसा हे सर्वकाही शिवसेनेमुळे आहे. पक्षात येण्यापूर्वी तुम्ही कोण होता असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर खोचक टिका केली. या पक्षात वैयक्तिक असा कोणीच मोठा नाही. पक्षानेन दिलेली ताकद आणि संधी यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज मंत्रीपदावर जाता आले आहे. पण काहींना त्याचा विसर पडला. हे असले शिवसैनिक होऊच शकत नाहीत. एवढे करुनही बाळासाहेबांचे नाव गटाला दिले जात आहे ही लाजीरवाणी गोष्टयं. सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक यांना कदापी क्षमा करणार नसल्याचेही राऊतांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पक्षामुळेच आम्ही राष्ट्रीय नेते

शिवसेना पक्षात एकी नसल्यानेच आजचे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय बंडखोरांकडून पक्षाने काय दिले असा मुद्दा उपस्थित केला जात असाताना आता खा. संजय राऊत हे पक्षाचे कार्यकर्त्यांसाठी किती योगदान आहे हे पटवून देत आहेत. दहिसर येथील मेळाव्यात त्यांनी पक्ष आणि शिवसैनिक यांचे नाते यावर भाष्य करताना शिवसेना या चार शब्दांचे महत्व विषद केले. पक्षामुळे आज सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमदार, खासदार झाला आहे. या पक्षामुळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक यामुळेच दिल्लीतही वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत बंडखोरामुळे शिवसैनिकावर आणि पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी पटवून दिले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें